सरकारी शिक्षकाकडून गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुचाकीवरून चार जिल्ह्यांत फिरवला, 'त्या' एका फोटोवरून...

Crime News : सरकारी शिक्षकाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिने चार जिल्ह्यांमध्ये मृतदेह फिरवल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:40 PM • 30 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी शिक्षकाकडून प्रेयसीची हत्या

point

मृतदेह चार जिल्ह्यांमध्ये फिरवला

point

दोघांमध्ये 'त्या' कारणावरून वाद

Crime News : सरकारी शिक्षकाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिने चार जिल्ह्यांमध्ये मृतदेह फिरवल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना बिहारमधील बेगूसराय येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 किमीचा प्रवास केला होता. त्यानंतर एका ठिकाणी त्याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह फेकून दिला. मृत तरुणीची ओळख भारती कुमारी अशी आहे. ती पटणात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांकडून हत्येमागील कटाचा तपास 

संबंधित प्रकरणात आरोपीची ओळख ही सरकारी शिक्षक असून त्याचे नाव गोपाळ असे आहे. तो बिहारमधील बेगूसराय येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. 15 ऑक्टोबर रोजी बोरी येथे तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून हत्येमागील कटाचा तपास केला. तपासादरम्यान, पोलिसांनी भारती कुमारचे कॉल डिटेल्स तपासले. 

11 ऑक्टोबर रोजी भारतीने तिच्या कुटुंबाशी बोलल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर, 13 ऑक्टोबरपासून तिचा फोन बंद होता. कॉल्स डिटेल्स तपासल्यानंतर असे दिसून आले की 9 ऑक्टोबर रात्री भारती कुमारीने बरैनी येथे होती. त्यानंतर ती गोपाळसोबत किशनगंज येथे गेली होती. संबंधित प्रकरणात पोलिसांना संशय आला की, त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी प्रयागराजमध्ये गोपाळला अटक केली, गोपाळच्या चौकशीदरम्यान, हत्येमागील कट उघड झाल्याचे चित्र आहे. 

हे ही वाचा : महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या? 7 वाजता मृत्यू, बहिणीच्या स्टेटसला 11 वाजता लाईक? सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे

तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत फोटो पाहिला आणि...

चौकशीदरम्यान, गोपाळने कबूल केलं की दोघांचे जवळजवळ दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 13 ऑक्टोबर रोजी गोपाळने भारतीचा दुसऱ्या मुलासोबतचा फोटो पाहिला, तेव्हा दोघांमध्ये वाद उफळला. त्यानंतर गोपाळनेच तरुणीचा हत्या केली. त्यानंतर गोपाळने भारतीचा मृतदेह हा किशनगंजहून नेला, चार जिल्ह्यात नेला आणि नंतर बेगुसराय येथे नेला. 

    follow whatsapp