WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई तक

26 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 11:49 AM)

एक महिला सुरक्षा रक्षक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली.

Mumbai Tak
Google CTA

sex racket news thane :

हे वाचलं का?

ठाणे : येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिला सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला मुंब्रा रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक महिला सुरक्षा रक्षक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली. (Thane Police has arrested a female security guard who was running a sex racket through WhatsApp)

चौकशीत असे आढळून आले की, ही महिला व्हॉट्सअॅपद्वारे मुली आणि ग्राहकांशी संपर्क करत असे. त्यानंतर ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी मुलींना पाठवत असे. सध्या अटक केलेल्या महिलेची चौकशी सुरू आहे. या महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत भरदिवसा तीन जणांचा खून, 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांना संपवलं!

यापूर्वीही झाल्या आहेत कारवाया :

ठाण्यात यापूर्वीही सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अभिनेत्री, दोन महिला दलाल आणि एका पुरूष दलालासह पाच जणांना अटक केली होती.

नाशिक हादरलं… कंपनीच्या CEO ची भररस्त्यात गाडी अडवून निर्घृण हत्या

तर मागील महिन्यात ठाण्यात एका 24 वर्षीय महिलेला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही मुलगी मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी असून तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने सांगितले की एका बनावट ग्राहकाने देह व्यापाराची पुष्टी केली, त्यानंतर आरोपी तरुणीला कळवा नाका येथून अटक करण्यात आली.