नऊ मुलांच्या आईने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, राजा-सोनम प्रकरणापेक्षा संतापजनक घटना

पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रतिरामची पत्नी रीना हीचे हनीफ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.  रीना आणि तिचा पती रतिराम यांच्यात बराच काळ वाद सुरू होता.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील हादरवून टाकणारी घटना

point

नऊ मुलांच्या आईने पतीला का संपवलं?

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील भरगेन गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  9 मुलांच्या आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय.  रतिराम नट असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. त्याचा मृतदेह गावातील एका बंद पडलेल्या विटांच्या भट्टीवर आढळला.

हे वाचलं का?

कशी घडली घटना?

पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रतिरामची पत्नी रीना हीचे हनीफ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.  रीना आणि तिचा पती रतिराम यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. या मतभेदांमुळे रीनाने आपला प्रियकर हनीफ याच्यासोबत मिळून रतिरामच्या हत्येचा कट रचला. दोघांनी संधी साधून विटांच्या भट्टीवर रतिरामची हत्या केली. हत्येनंतर रीना आपल्या नऊ मुलांना सोडून फरार झाली आहे.

हे ही वाचा >> खासदार आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर तरूणीचे लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाली आता मी...

घटनास्थळी एसपी अंकिता शर्मा, एएसपी राजेश भारती, सीओ पटियाली आणि फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन तपास केला. फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण हत्याकांडाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गडगडले; आजचे भाव वाचून आनंदच होईल​​​​​

देशभरात मागच्या काही दिवसांपासून इंदोरच्या राजा आणि सोनमच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. त्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्येच पतीची हत्या करून, मृतदेह ड्रममध्ये टाकला. अशा अनेक घटना सध्या चर्चेत आहेत. त्यातच आता ही घटना घडली आहे. 

    follow whatsapp