दुकानातून घरी येताना वाटेतच अडवलं अन् शाळेत नेऊन... अल्पवयीन मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य!

पीडिता दुकानातून सामान घेऊन घरी परतत असताना आरोपी तरुणाने तिला वाटेतच थांबवलं आणि तिला शाळेत नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य!

अल्पवयीन मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य!

मुंबई तक

• 05:43 PM • 27 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरी येताना वाटेतच अडवलं अन् शाळेत नेऊन घृणास्पद कृत्य...

point

अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: बिहारमधील हाजीपूर येथील भगवानपुर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकरणातील पीडिता दुकानातून सामान घेऊन घरी परतत असताना आरोपी तरुणाने तिला वाटेतच थांबवलं आणि तिला शाळेत नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. 

हे वाचलं का?

घटनेनंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून लगेच फरार झाला. या प्रकरणाबाबत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित घटनेबद्दल पोलीस चौकशी करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

परिसरातील लोकांची चौकशी

महिला ठाण्यातील पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं आणि तिथे पीडित मुलीची तपासणी केली गेली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमने सुद्धा सर्व पुरावे गोळा केले आणि यासंबंधी परिसरातील लोकांची सुद्धा चौकशी करण्यात आली. 

हे ही वाचा: अचानक घरात घुसला माथेफिरू, आईसमोर पाच वर्षांच्या मुलाचं मुडकंच छाटलं अन्... नेमकं काय घडलं?

पीडितेच्या वडिलांनी दिली माहिती...

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी किराणा दुकानातून सामान घरी परतत होती. त्यावेळी गावातील एका तरुणाने तिला वाटेतच अडवलं आणि पीडितेचं तोंड दाबून तिला जवळच्या सरकारी शाळेत नेलं. त्या ठिकाणी आरोपी तरुणाने पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. घटनेनंतर, पीडित तरुणी कशीबशी घरी पोहोचली आणि कुटुंबियांना या प्रकरणासंबंधी माहिती दिली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट! 'इतक्या' स्थानकांचं काम पूर्ण... रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि तिच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत. एफएसएल टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले असून आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या, या प्रकरणासंबंधी आवश्यक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

    follow whatsapp