मुंबईची खबर: बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट! 'इतक्या' स्थानकांचं काम पूर्ण... रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन योजनेचं काम अगदी वेगाने सुरू असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असून त्यातील 8 स्टेशन्सचं काम पूर्ण झालं झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट!

'इतक्या' स्थानकांचं काम पूर्ण...

रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती
Mumbai News: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन योजनेचं काम अगदी वेगाने सुरू असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असून त्यातील 8 स्टेशन्सचं काम पूर्ण झालं झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही स्थानकांचं काम पूर्ण झाल्यानंतर आतील इंटीरिअर आणि आवश्यक साइनबोर्ड्स तसेच एस्केलेटर लावण्याचं काम सुरू झालं आहे. बुलेट ट्रेनचं ट्रायल रन पुढच्या वर्षीच गुजरातमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूरत बुलेट स्थानकावर पोहोचून निरीक्षण केलं.
आठ स्थानकांचं काम पूर्ण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सुरूवात गुजरातमध्ये साबरमती स्टेशनपासून होणार आहे. त्यानंतर, ही ट्रेन अहमदाबाद स्टेशन आणि नंतर आणंदवरून वडोदरा येथे पोहोचेल. वडोदराच्या भरूच आणि नंतर सूरत स्टेशन येईल. त्यानंतर, बिलिमोरा आणि वीपी स्थानके असतील. दरम्यान, पुढील चार स्थानके महाराष्ट्रात असतील. यामध्ये बोईसर, विरार, ठाणे आणि बीकेसी म्हणजे मुंबईचं लास्ट स्टेशन आहे. गुजराच्या आठ स्थानकांचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. बुलेट ट्रेनचं ट्रायल सूरत ते बिलिमोरा दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा: Govt Job: पदवीधरांसाठी खुशखबर! 'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती... कधीपर्यंत कराल अप्लाय?
'या' सुविधा उपलब्ध असतील
बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांना वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवाशांना एअरपोर्टसारख्या सुविधा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानकांवर आरामदायी इंटीरिअर आणि हवेशीर प्लॅटफॉर्म असतील. तसेच, प्रतीक्षालय, नर्सरी, शौचालये आणि रिटेल शॉप्स यासारख्या आधुनिक प्रवासी सुविधा स्थानकांवर उपलब्ध असतील. सूरत स्थानक हे सूरत-बारडोली रोडजवळ अंतरोली गावात असून बुलेट ट्रेन स्टेशन बीआरटीएस बस स्टॉपपासून 330 मी अंतरावर आहे. प्रस्तावित मेट्रो स्टेशन 280 मी दूर असून सूरत रेल्वे स्टेशन 11 किमी अंतरावर आहे. यासोबतच, सूरत सिटी बस स्टँड 10 किमी अंतरावर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे दागिने लुटायचे, चोरीची 'अशी' ट्रिक अन्... ठाण्यातील दोघांना अटक
कसं असेल सूरत बुलेट ट्रेन स्टेशन?
सूरत बुलेट ट्रेन स्टेशनची उंची 26.3 मी असून ते एकूण 58,352 वर्ग मीटर क्षेत्रफळात बनवलं गेलं आहे. पूर्ण स्टेशन बिल्डिंगच्या स्तरांमध्ये असून ग्राउंड फ्लोअरवर पार्किंग सुविधा, पिक अॅण्ड ड्रॉप सर्व्हिस (कार, बस, ऑटो), लिफ्ट, स्वयंचलित जिना इ. असतील. त्यानंतर, कॉन्कोर्सवर वेटिंग लाउंज, शौचालय, कियोस्क, तिकीट काउंटर इ. असतील आणि त्यानंतर, सर्वात वरच्या फ्लोअरवर प्लॅटफॉर्म असतील. या प्लॅटफॉर्मवरून लोक मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन पकडून शकतील. 508 किमी लांब बुलेट ट्रेन कॉरिडोरमध्ये 323 व्हायाडक्ट आणि 339 किमी पिअरचं काम पूर्ण झालं आहे.