मित्रावर नको तितका विश्वास ठेवला अन् त्यानेच केला घात! पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्याच भावाला पाठवले अन्...

मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसोबत भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. तिची ओळख एका तरुणासोबत झाली. ते दोघे कॉलेजमध्ये एकत्रच शिकत होते आणि कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर, तरुणाने तिचा विश्वास संपादन केला आणि यातूनच तिच्यासोबत भयंकर घटना घडली.

पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्याच भावालाच पाठवले अन्...

पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्याच भावालाच पाठवले अन्...

मुंबई तक

• 04:54 PM • 10 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मित्रावर नको तितका विश्वास ठेवला अन् त्यानेच केला घात!

point

पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्याच भावाला पाठवले अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील मैनपूरी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आग्राच्या सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसोबत भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित तरुणी तिथल्या एमएम गेट परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. दरम्यान, तिची ओळख एका तरुणासोबत झाली. ते दोघे कॉलेजमध्ये एकत्रच शिकत होते आणि कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर, तरुणाने तिचा विश्वास संपादन केला आणि यातूनच तिच्यासोबत भयंकर घटना घडली. 

हे वाचलं का?

या काळात, त्या दोघांचं सतत व्हिडीओ कॉलवर बोलणं व्हायचं आणि त्यावेळी आरोपीने तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले. पीडितेला या सगळ्याची कल्पना सुद्धा नव्हती. ज्या तरुणाला ती विश्वासू मित्र समजत होती, त्यानेच तिचे घाणेरडे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून तिचा विश्वासघात केला. 

हे ही वाचा: कुर्ला: ऑनलाइन गेमसाठी मित्राच्या खात्यातून 30,000 रुपये घेतले अन् हारल्यानंतर पैशांची मागणी केली असता निर्घृण हत्या...

पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्... 

काही काळानंतर, पीडितेला तिच्या मित्राच्या घाणेरड्या आणि वाईट कृत्याची जाणीव झाली आणि तिने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. मात्र, यामुळे आरोपी तरुण प्रचंड संतापला आणि त्याने आपले खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली. तो तरुण पीडितेला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. बरेच दिवस, त्याने तरुणीला घाबरवून तिच्याकडे नको त्या मागण्या केल्या. त्यावेळी, आरोपीच्या मागण्या पूर्ण करण्यास पीडितेने स्पष्टपणे नकार दिला. मात्र, त्यानंतर आरोपी तरुणाने त्याच्या सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याने पीडितेच्या सख्ख्या भावाच्या मोबाईल तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले. या घटनेने तरुणीचं कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: Govt Job: भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...

यानंतर, पीडितेने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत एफआयआर दाखल केली आणि सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, आरोपीच्या मोबाईल फोनची तपासणी केली आणि त्यामधून पीडितेचे सगळे आक्षेपार्ह फोटो तसेच व्हिडीओ ताब्यात घेण्यात आले. आता, पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी अॅक्ट आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 

    follow whatsapp