Ajit Pawar : "...मग सूनेने काय नुसतं बघत बसायचं का?", अजित पवार शरद पवारांवर भडकले

मुंबई तक

• 05:49 PM • 16 Apr 2024

Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवार यांनी शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या विधानाला काय दिले उत्तर?

अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर टीका

अजित पवार आणि शरद पवार.

follow google news

Ajit Pawar on Sharad Pawar, Baramati Lok Sabha Election 2024 : (वसंत मोरे, बारामती) बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील सुपे येथे महायुतीचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांनी केलेल्या मूळचे पवार आणि बाहेरचे पवार या विधानाला उत्तर दिले. (Baramati lok sabha latest News : Ajit Pawar Hits Out at Sharad Pawar)  

हे वाचलं का?

"काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल... त्यांना म्हणावं जुना काळ आता बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या. असं सांगा ना. कायम सासू... सासू.. सासू... मग सूनेने काय नुसतं बघत बसायचं का?", असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला. 

असं कुठं असतं का राव? अजित पवारांचा सवाल

अजित पवार पुढे म्हणाले, "बाहेरची... बाहेरची... बाहेरची. असं कुठे असतं का राव? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. पण, ४० वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाल्यावर घरची? सांगा आया बहिणींनो... बघा बाबा आता...", असे उत्तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलं. 

खासदाराची पर्स कोण सांभाळणार?

सुप्रिया सुळे यांनी खासदारांची पर्स सांभाळणार का? असं म्हणत अजित पवारांना डिवचलं होतं. त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिलं.

हेही वाचा >> महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल 

ते म्हणाले, "महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. त्या उमेदवाराने जर आपले काम केले नाही, तर त्याचा जाब मला विचारा. मी त्या खासदारासोबत जाईन आणि काम करून घेईन. काहीजण म्हणतात की, खासदाराची पर्स सांभाळणार का? पण, तसं नाही. पर्स खासदारच सांभाळणार. मी फक्त बरोबर जाईन", अशा शब्दात अजित पवारांनी पलटवार केला.

हेही वाचा >> 'मविआ' किती जागा जिंकणार? ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी

"तुम्ही जरा आत्मचिंतन कार. अगदी 90 सालापासून बारामतीत फॉर्म भरल्यानंतर 'नेते' फक्त शेवटच्या सभेला यायचे. आता का गावोगावी फिरतात? का आम्हाला विरोध करतात. मी इतक्या वर्ष साथ दिली नाही का? कशात कमी पडलो?", असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला. 

    follow whatsapp