Maha Vikas Aghadi : 23-14-6... काँग्रेसने ठरवला मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला!

भागवत हिरेकर

• 09:00 AM • 20 Mar 2024

seat sharing formula of Maha Vikas Agahdi : महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत काँग्रेस नेत्यांची झाली बैठक.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला काय दिला आहे नवा प्रस्ताव?

प्रकाश आंबडेकर यांनी नवा प्रस्ताव दिल्याने चलबिचल सुरू झाली आहे.

follow google news

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats Sharing : महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) फॉर्म्युला 21 मार्च रोजी निश्चित होणार असल्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडीसाठी 23-14-6 अशा फॉर्म्युल्यावर चर्चा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झाल्यास त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत 4 जागा देण्याची तयारी आहे. त्यांनी आघाडीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला आणखी 4 जागा मिळतील. (Congress is likely to finalize the seat-sharing formula with Uddhav Thackeray's Shiv Sena (UBT) and Sharad Pawar's NCP in Maharashtra on March 21.)

हे वाचलं का?

या फॉर्म्युल्यानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 23 जागा मिळू शकतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेस 19 जागांवर निवडणूक लढवू शकते. मुंबईत 21 मार्च रोजी जागावाटपाची अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहून आपली वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सात जागांवर पक्षाला बाहेरून पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडी अद्यापही वंचित बहुजन आघाडीचा भाग नाही.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा

काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली आणि विविध राज्यांतील लोकसभा जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे.

स्क्रीनिंग समितीच्या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले हे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत, जे उत्तर प्रदेश नंतर जागांच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. यूपीमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत.

पश्चिम बंगालवरही झाली चर्चा 

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक दिल्ली काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

आंध्र प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांव्यतिरिक्त, कर्नाटक, तेलंगणा, चंदीगड आणि पश्चिम बंगालमधील 30 हून अधिक लोकसभा उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातसह अन्य जागांसाठीच्या उमेदवारांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित

सूत्रांनी सांगितले की, उत्तर आणि मध्य पश्चिम बंगालमधील जागांवर चर्चा करण्यात आली आणि जिंकण्यायोग्यतेच्या आधारावर डाव्या पक्षांसाठी कोणत्या जागा योग्य असतील आणि काँग्रेससाठी कोणत्या जागा योग्य असतील याचा विचार करण्यात आला. 

पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे दोन विद्यमान लोकसभेचे सदस्य - बेहरामपूरचे अधीर रंजन चौधरी आणि मालदा दक्षिणमधून अबू हसम खान चौधरी - हे पुन्हा पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि पॅनेलचे इतर सदस्य कार्य समितीच्या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला पॅनलचे सदस्य असलेले राहुल गांधी उपस्थित नव्हते. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 82 उमेदवारांची घोषणा केली आहे.

    follow whatsapp