Baramati Lok Sabha : अजित पवारांसोबत वाद... हर्षवर्धन पाटील फडणवीसांमध्ये चर्चा

ऋत्विक भालेकर

20 Mar 2024 (अपडेटेड: 20 Mar 2024, 01:09 PM)

Harshvardhan Patil Devendra Fadnavis : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी भेट का घेतली आणि काय चर्चा झाली, याबद्दल जाणून घ्या...

एकीकडे विजय शिवतारेंनी दंड थोपटले असतानाच दुसरीकडे राजकीय वैर असलेले हर्षवर्धन पाटील फडणवीसांना भेटले.

follow google news

Harshvardhan Patil Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांसमोर महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांचं आव्हान उभं ठाकलं आहे. एकीकडे विजय शिवतारेंनी दंड थोपटले असतानाच दुसरीकडे राजकीय वैर असलेले हर्षवर्धन पाटील फडणवीसांना भेटले. हर्षवर्धन पाटील यांनी भेट का घेतली आणि काय चर्चा झाली, याबद्दल जाणून घ्या...

हे वाचलं का?

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असं आहे की, माढा असेल किंवा बारामती असेल... सगळ्यांचं लक्ष एक आहे; महायुतीला मजबूत करणे, मोदीजींना पंतप्रधान बनवणे. त्यामुळे जे थोडेफार मतभेद असतील, तर ते दूर झाले पाहिजे. त्यामुळे मी हेच म्हणेन की, ज्या माझ्या बैठका झाल्या आहेत. त्या अतिशय सकारात्मक झाल्या आहेत." 

हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना काय सांगितले?

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, "लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली. खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा झाली. चर्चेमध्ये जे काही आमचे प्रश्न... कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही फडणवीसांसमोर मांडल्या. मधल्या काळात अमित शाह यांच्यासोबतही आमची या प्रश्नावर चर्चा झालेली आहे."  

"एकमात्र निश्चित आहे की, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवणं ही भाजप, महायुती म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण, स्थानिक स्तरावर जे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नामुळे जे विषय समोर आले आहेत, त्यावर चर्चा झाली. आम्हाला फडणवीसांनी आणि अमित शाहांनी आश्वासित केलेले आहे की, या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढतील. पक्ष काढेल. चर्चा सकारात्मक झाली. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जे काही सहकार्य करायचे आहे, आम्ही निश्चितपणे काम करू", असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.  

अजित पवारांसोबत बैठक

पाटील म्हणाले की, "आम्ही ही पण भूमिका मांडली की अजित पवारांबरोबर चर्चा होणे गरजेचे आहे. जे काही विषय आहेत, शेवटी महायुतीमध्ये प्रत्येकाच्या भूमिकेसंदर्भात बैठक होणं महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यासमवेत बैठक घेण्याचे फडणवीसांनी मान्य केले आहे. महायुतीचे सरकार आहे, तर वातावरण पण निर्माण झाले पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने पाळली पाहिजे. ते व्यवस्थित पाळल्या गेलं, तर खाली कार्यकर्त्यांच्या स्तरावर सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. आता पुढे अजित पवारांसोबत बैठक होणार आहे", अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 

    follow whatsapp