Shiv Sena Lok Sabha Candidates: अखेर शिंदेंनी जाहीर केले उमेदवार, पाहा पहिली यादी!

ऋत्विक भालेकर

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 07:46 PM)

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाने आज (28 मार्च) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी 8 उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

शिवसेना (शिंदे गट) यांची पहिली यादी जाहीर

शिवसेना (शिंदे गट) यांची पहिली यादी जाहीर

follow google news

Eknath Shinde Announced Shiv Sena Candidates 1st List: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज (28 मार्च) जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहेत. (lok sabha election 2024 finally the shiv sena shinde group announced the candidates see first list)

हे वाचलं का?

आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या यादीत शिंदे गटाने त्यांचे बालेकिल्ले समजले जाणारे ठाणे आणि कल्याण या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा: रात्रीत कसं फिरलं बारामतीचं राजकारण? पवार-शिवतारेंच्या एकीची Inside Story

काही मतदारसंघावरून महायुतीमध्ये मोठा पेच आहे. पहिल्या यादीत शिंदेंनी अगदी सेफ समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारच जाहीर केले आहेत.  

पाहा शिवसेनेच्या (शिंदे गट) पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं  

​​​​​​​

  1. मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
  2. कोल्हापूर - संजय मंडलिक
  3. शिर्डी - सदाशिव लोखंडे
  4. बुलढाणा - प्रतापराव जाधव
  5. हिंगोली - हेमंत पाटील
  6. रामटेक - राजू पारवे
  7. हातकणंगले - धैर्यशील माने 
  8. मावळ - श्रीरंग आप्पा बारणे

हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ शिंदेकडे 

महायुतीत काही जागांचा पेच अद्यापही फसला आहे. ज्यामध्ये नाशिक, दक्षिण मुंबई, पालघर यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत या जागांबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या जागांचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा: शिंदेंची मोठी खेळी, मुंबईतील 'या' नेत्याचं तिकीट कापणार?

मात्र, मुंबई दक्षिण-मध्य आणि कोल्हापूर या जागा स्वत:कडे राखण्यात शिंदेंना यश आलं. कोल्हापुरात महायुतीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर या जागेसाठी भाजप प्रचंड आग्रही होतं. मात्र, शिवसेनेने ती जागा सोडण्यास नकार दिला. अखेर भाजपने ही जागा शिंदे दिली आहे. जिथे आता शिंदेंनी संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे.

याशिवाय मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून सलग दोनदा निवडून येणाऱ्या राहुल शेवाळे यांनाच शिंदेंना पुन्हा तिकीट दिलं आहे. 

धक्कातंत्राचा अजिबात वापर नाही! 

एकनाथ शिंदे हे जागा वाटपात भाजपप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करू शकतात अशी जोरदार चर्चा होती. मात्र, पहिल्या यादीत तसं काहीही न केल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या यादीत जे आठ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यापैकी 7 उमेदवार हे शिवसेनेचे विद्यमान खासदारच आहेत. 

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर जे खासदार त्यांच्यासोबत आले होते त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा धोरणीपणा शिंदे दाखवल्याचं पहिल्या यादीत दिसंतय. या यादीत केवळ रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. जे कालच जाहीर झालं होतं. कारण त्या ठिकाणाहून शिवसेनेकडून राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

    follow whatsapp