Lok Sabha Election 2024: 'या' उमेदवारांकडे उरले फक्त 24 दिवस... नेमकं काय होणार?

मुंबई तक

• 03:35 PM • 25 Mar 2024

Lok Sabha Election 2024 Vidharbha Candidate: विदर्भातील पाच मतदारसंघामधील 10 उमेदवारांकडे आता अवघे 24 दिवस उरले आहेत. जाणून घ्या येथील नेमकी राजकीय लढाई कशी असेल.

'या' उमेदवारांकडे उरले फक्त 24 दिवस...

'या' उमेदवारांकडे उरले फक्त 24 दिवस...

follow google news

Vidharbha Candidate list: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 ही एकूण सात टप्प्यात पार पडणार आहे. याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ही 19 एप्रिलपासून होणार आहे. याच पहिल्या टप्प्यापासून महाराष्ट्रात देखील मतदानाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच महत्त्वाचे मतदारसंघ असणार आहेत. येथील उमेदवारही जवळपास जाहीर झाले आहेत. पण असं असताना काही उमेदवारांची मात्र आता चांगलीच दमछाक होत आहे. (lok sabha election 2024 only 24 days left for candidates in five constituencies in vidarbha see which constituencies will be most exciting battle)

हे वाचलं का?

विदर्भातील पाच मतदारसंघासाठी मतदान हे पहिल्या टप्प्यात पार पडणार आहे. पण आता येथील उमेदवारांकडे अवघे 24 दिवसच प्रचारासाठी शिल्लक आहेत. अशावेळी मतदारांपर्यंत नेमकं पोहचायचं कसं असा मोठा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

सर्वात आधी आपण पहिल्या टप्प्यात कोणाच्या लढती कोणासोबत होणार हे पाहूयात:

1. नागपूर: नितीन गडकरी (भाजप) x विकास ठाकरे (काँग्रेस)

2. भंडारा-गोंदिया: सुनील मेंढे (भाजप) x प्रशांत पडोळे (काँग्रेस)

3. गडचिरोली-चिमूर: अशोक नेते (भाजप) x नामदेव किरसान (काँग्रेस)

4. चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार (भाजप) x प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

5. रामटेक:  रश्मी बर्वे  (काँग्रेस) x (महायुतीकडून राजू पारवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता)

आता या नऊ उमदेवारांकडे अवघे 24 दिवसच शिल्लक आहेत. रामटेकमधील महायुतीचा नेमका उमेदवार कोण असेल हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र, काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे शिवसेना (शिंदे गट) मध्ये आल्याने तेच रामेटकचे उमेदवार असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या पाचही मतदारसंघात दोन्ही राष्ट्रीय पक्षाचेच उमेदवार हे आमनेसामने आहेत.

हे ही वाचा>> तुमच्या मतदारसंघात अशी होणार लढत, पाहा उमेदवारांची यादी

भाजपने आपली पहिली यादी जेव्हा जाहीर केली होती त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यावरून भाजपवर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत विकास ठाकरे यांची नागपूरचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे येथील लढाई ही गडकरी विरुद्ध ठाकरे अशीच होणार आहे. ज्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

मात्र, या पाच मतदारसंघापैकी चंद्रपूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण येथील लढाई ही अत्यंत अटीतटीची समजली जात आहे. भाजपने आपल्या पहिल्याच यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, काँग्रेसकडून अत्यंत शेवटच्या क्षणी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हा तोच मतदारसंघ आहे जिथे 2019 साली काँग्रेसला यश मिळालं होतं. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळेच आता या मतदारसंघातून स्वर्गीय बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्याचा निर्णय पक्का झाला.

हे ही वाचा>> Lok Sabha Elections 2024 : उमेदवारी मिळताच धानोरकरांनी मुनगंटीवारावर चढवला हल्ला

याशिवाय भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात भाजपने आपल्या विद्यमान खासदारांनाच तिकीट दिलं आहे. येथे त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. भंडारातून सुनील मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक नेते यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोली-चिमूरमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. 

आता या पाचपैकी किती जागांवर कोण नेमकी बाजू मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत विदर्भाने भाजपला भरभरून मतं दिली होती. मात्र, 2024 च्या निवडणुकीत इथे कोणाचे खासदार येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp