Lok Sabha Elections 2024 : उमेदवारी मिळताच धानोरकरांनी मुनगंटीवारावर चढवला हल्ला

योगेश पांडे

ADVERTISEMENT

pratibha dhanorkar criticize sudhir mungatiwar chandrapur lok sabha election 2024 vijay waddetiwar maharashtra politics
'जितना संघर्ष ज्यादा होगा, जीत उतनी शानदार होगी'.
social share
google news

Pratibha Dhanorkar Criticize Sudhir Mungantiwar : नागपूर : चंद्रपुर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रतिभा धानोरकर अॅक्टीव्ह झाल्या असून त्यांनी सुधीर मुनगंटीवारांवर (Sudhir Mungantiwar) पहिला हल्ला चढवला आहे. 'भारतीय जनता पक्ष हा हुकूमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे माझी लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असल्याची' टीका प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी केली आहे.  (pratibha dhanorkar criticize sudhir mungatiwar chandrapur lok sabha election 2024 vijay waddetiwar maharashtra politics) 

काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर आज नागपूरमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, '2019 च्य्या निवडणूकीत असाच संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता. दहा महिन्यापुर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. याला मी नक्की सर करेन. माझी जबाबदारी मी यशस्वी पार पाडेन. मला उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्याचे आभार', असे प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. 

हे ही वाचा : तुमच्या मतदारसंघात अशी होणार लढत, पाहा उमेदवारांची यादी

तसेच 'मातब्बर मंत्री अशी ओळख असलेले मुनगंटीवार माझ्या विरोधात असल्याने माझी ही लढाई हवी तेवढी सोपी नाही. त्यांना राजकारणातला दांडगा अनुभव आहे. भारतीय जनता पक्ष हा हुकूमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, राजा बोले तैशी दाढी हाले अशी स्थिती या पक्षाची आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असणार असल्याची' टीका प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. मी एक स्टेटस ठेवलं होतं 'जितना संघर्ष ज्यादा होगा, जीत उतनी शानदार होगी'. आमचा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार आहे, संविधानात प्रत्येकाला दावेदारी करण्याचा नैतिक अधिकार आहे. भारतीय जनता पक्ष हा हुकूमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे राजा बोले तैशी दाढी हाले अशी स्थिती या पक्षाची आहे. त्यामुळे आमची लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे, त्यामुळे सगळे एकत्र येऊन काम करतील,असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :  महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागली आग

दरम्यान विजय वड्डेटीवारांच्या उमेदवारीवर बोलताना धानोरकर म्हणाल्या की, आमचा पक्ष संविधान आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे जे काही ध्येय धोरण असतील. त्यानुसार त्यांना उमेदवारी मिळाली असती तर मी आदेश फॉलो केले असते. मला उमेदवारी मिळाली तर ते पक्षाचे आदेश फॉलो करतील. ही आमची सगळ्याची लढाई असल्याने तळागाळातील सगळे पदाधिकारी एकत्र येऊन ही निवडणूक आम्ही लढू. विरोधी पक्षनेते म्हणून मी त्यांना निमंत्रण देईल आणि ते येतील असा विश्वास असल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT