Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापुरात लोकसभेचं गणित बदललं, प्रणिती शिंदेंना 'या' पक्षाचा पाठिंबा!

मुंबई तक

08 Apr 2024 (अपडेटेड: 08 Apr 2024, 04:09 PM)

Narasayya Adam Support Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी आज नरसय्या आडम यांच्या दत्तनगरमधील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभेतून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

 solapur lok sabha election 2024 narasayya adam support praniti shinde bjp ram satpute candidate bjp nda vs india alliance

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

follow google news

Narasayya Adam Support Praniti Shinde : विजयकुमार बाबर, सोलापुर : लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे विरूद्ध महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपूते यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता सोलापुरात प्रणिती शिंदे यांची ताकद वाढणार आहे. (solapur lok sabha election 2024 narasayya adam support praniti shinde bjp ram satpute candidate bjp nda vs india alliance) 

हे वाचलं का?

प्रणिती शिंदे यांनी आज नरसय्या आडम यांच्या दत्तनगरमधील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापुर लोकसभेतून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आडम यांच्या या पाठींब्याने आता सातपुतेंपुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Supriya Sule : "अजित पवारांचं मला निवडून आणण्यात खूप मोठं योगदान"

माध्यमांशी बोलताना आडम म्हणाले की, आपलं संविधान धोक्यात आलं आहे. लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही आणि फॅसिस्टची राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे आहे. मग कामगार, शेतकरी, महिला, युवा, दलित, मुस्लीम असतील. हे सगळे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. दुसरीकडे भाजप मुस्लीम विरूद्ध हिंदू अशा प्रकारच वातावरण तयार करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न करतेय, असा आरोप आडम यांनी भाजपवर केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनला देखील तुरुंगात घातलं. संपूर्ण व्यवस्था ही उद्भ्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देशात 83 टक्के तरूण बेरोजगार आहेत. 35 कोटी जनतेची एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा परीस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएऐवजी इंडिया आघाडीचे सरकार आणण्याचं काम केले पाहिजे. त्यादृष्टीने आमदार प्रणिती शिंदे यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आमचा अंदाज आहे, आम्हाला मानणारा जो कामगार वर्ग आहे, तो हजारोंच्या संख्येने काँग्रसेला पाठिंबा देईल. त्यामुळे सोलापूरातून आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणू, असा विश्वास आडम यांनी यावेळी व्यक्त केला. 

हे ही वाचा : "संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा", निरुपमांच्या आरोपाने खळबळ

दरम्यान सोलापुर लोकसभा मतदार संघात प्रणिती शिंदे विरूद्ध राम सातपूते यांच्यात थेट लढत होणार आहे. पण वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाच गणित बदलणार आहे. याचा फटका प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे. पण आता नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याने सोलापूरात त्यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp