Sanjay Nirupam : "संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा", निरुपमांच्या आरोपाने खळबळ

मुस्तफा शेख

Sanjay Nirupam on Sanjay Raut : माजी खासदार संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांच्यावर संजय निरुपम यांनी गंभीर आरोप केले आहेत.
माजी खासदार संजय निरुपम यांचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माजी खासदार संजय निरुपम यांनी केले गंभीर आरोप

point

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप

point

संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी

Sanjay Nirupam Sanjay Raut Khichadi scam : मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटपात घोटाळ्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत अडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sanjay Nirupam Alleged that Sanjay Raut has taken money in BMC Khichadi scam in name of his daughter, brother and partner)

माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जे उमेदवार (अमोल कीर्तीकर) आहेत, खिचडीचोर.. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोराविरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी", असे निरुपम सुरूवातीला म्हणाले.

हेही वाचा >> "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, "खिचडी चोर आणि खिचडी घोटाळ्यावर मी काम सुरू केलं, तेव्हा हे माहिती पडलं की, याचा मुख्य सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे. खिचडी घोटाळ्याचा जे मुख्य सूत्रधार आहे, ते शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत."

राऊतांनी मुलगी, भाऊ आणि भागीदाराच्या नावावर पैसे घेतले -निरुपम

"जेव्हा ते पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना पकडलं गेलं, तेव्हा हे आढळून आलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली आहे. बिल्डरकडून पैसे घेतले. यात पत्नीला आणायला नको होतं. आता हा जो घोटाळा केला आहे, त्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि त्यांचा जो भागीदार आहे, त्याच्या नावे पैसे घेतले आहेत", असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp