Lok Sabha election 2024 : "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, असे सांगितले.
रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
social share
google news

Ramtek lok sabha election 2024, Eknath Shinde, krupal tumane : 'एकनाथ शिंदे माझ्या उमेदवारी प्रयत्न करत होते, पण त्यांच्यावर खूप दबाब येत आहे, हे बघून मी मागे हटलो', असे विधान रामटेक लोकसभा मतदारसंघाचे विद्ममान खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे. कृपाल तुमाने यांचा पत्ता कट झाला असून, त्यांच्या ऐवजी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या राजकीय बदलानंतर प्रथमच तुमानेंनी जाहीरपणे भूमिका मांडली. (krupal tumane said that I withdrew from the Lok Sabha elections due to pressure on Shiv Sena Leader Eknath Shinde)

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे विद्ममान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट शिवसेनेकडून कापण्यात आले आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात जनमत असल्याच्या सर्व्हेतून समोर आल्याचा हवाला देत त्यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला. त्यामुळे तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमध्ये आमदार असलेल्या राजू पारवे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा >> "पक्ष फोडणाऱ्यांना...", देवेंद्र फडणवीसांना पवारांचा इशारा 

रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमाबद्दल कृपाल तुमाने यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. नागपूरमधील देशपांडे सभागृहात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. यात बोलताना तुमानेंनी भूमिका मांडली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कृपाल तुमानेंनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं?

कृपाल तुमाने म्हणाले की, "साहेबांनी (एकनाथ शिंदे) माझ्यासाठी खूप प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत साहेब झटत होते. लढत होते. मला जेव्हा वाटलं की आमच्या साहेबांवर खूप दबाव येत आहे, त्यामुळे मी मागे हटलो आणि साहेबांना म्हणालो की, तुम्हाला काय करायचं आहे, तो निर्णय तुम्ही घ्या, मी आता नागपूर जात आहे", असं तुमाने यांनी या कार्यक्रमात सांगितलं. 

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो... शिंदे 

तुमाने यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्यांनी (कृपाल तुमाने) बघितलं की, आपला नेता, मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करत होतो प्रामाणिक..."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल का? प्रशांत किशोरांचं मोठं भाकित

"त्यांना वाटलं की, खऱ्या अर्थाने आज हा आपला मुख्यमंत्री नाही, तर हा आपला मोठा भाऊ, हा आपला नेता नाही, तर स्वतःला कार्यकर्ता समजणारा आपला भाऊ माझ्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यांनी ते स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की, माझ्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. मी या निवडणुकीत राजू पारवे यांना पूर्ण पाठिंबा देतो. पूर्ण समर्थन देतो. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो घ्या", असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT