Sharad Pawar : "पक्ष फोडणाऱ्यांना...", देवेंद्र फडणवीसांना पवारांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोट
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर शरद पवारांचं बोट

point

शरद पवारांनी दिला इशारा

point

पक्ष फोडणाऱ्या कार्यकर्ते जागा दाखवतील, असे पवारांचे विधान

Sharad Pawar : "मी पुन्हा येईन म्हटलं होतं. त्यासाठी अडीच वर्ष लागली, मात्र अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो", असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले होते. फडणवीसांच्या या विधानावर आता शरद पवारांनी उत्तर दिले. कार्यकर्ते जागा दाखवतील असा इशाराही पवारांनी दिला. (Sharad Pawar replied to Devendra Fadnavis)

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिन अहिर, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानावर भाष्य केले. 

शरद पवार काय म्हणाले?

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका ठिकाणी सांगितलं की, मी दोन पक्ष फोडून, या ठिकाणी आलो आहे. मग काय कर्तृत्व आणि काय काम केलं?", असा सवाल पवारांनी फडणवीसांना केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "डॉक्टर नसलो तरी, गळ्याचे, कमरेचे पट्टे काढले", शिंदेंचे ठाकरेंवर 'बाण'

पुढे ते म्हणाले, "खऱ्या अर्थाने माणूस जोडण्याचं आणि ऐक्याचं काम करतो, त्याच्याबद्दल आदर सांगत असतो. पण, पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि कार्यकर्ते योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत", असा इशारा पवारांनी फडणवीसांना दिला. 

बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल पवाराचं भाष्य

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल भाष्य केलं. "आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण नक्की यश मिळवू, नक्की जास्त जागा जिंकू. बारामती लोकसभेची जागा तुम्हा लोकांच्या हातात आहे. तुमच्या कष्टानं बारामतीत नक्की यश संपादन करू. बारामतीकडे सुदैवाने देशाचं लक्ष आहे. याचा अर्थ तुमच्या कर्तृत्वाची, हिंमतीची नोंद देश पातळीवर घेतलेली आहे", असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT