ठाणे: ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
1. अंबरनाथ
अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी
● शिवसेनेचे 27 उमेदवार विजयी
● भाजपचे 14 उमेदवार विजयी
● काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी
● राष्ट्रवादी (अजित पवार) 4 उमेदवार विजयी
● अपक्ष 2 उमेदवारांचा विजय
----------
2. कुळगाव-बदलापूर
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
नगराध्यक्ष पद भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी
भाजप नगरसेवक - 23
राष्ट्रवादी अजित गट नगरसेवक - 3
शिवसेना नगरसेवक - 23
---------------
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-------
कुळगाव-बदलापूरमध्ये नगर परिषदेसाठी एकूण 58 टक्के मतदान झालं
बदलापूरमध्ये दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 47 टक्के मतदान झाल्याची माहिती
- दोन लाखांची रोकड पोलिसांनी केली जप्त
बदलापुरात दोन लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. बदलापूर पूर्वेच्या हॉली क्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये दोन लाखांची रोकड घेऊन चालला होता, त्यावेळेस भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं, त्याला त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. दरम्यान ही रोकड मतदारांना वाटायला आणली होती का? याची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- शिवसेना शिंदे गट–भाजपमध्ये जोरदार राडा
बदलापूर नगर परिषदेसाठी आज निवडणूक पार पाडत आहे. एकीकडे बदलापूरात मतदान उत्साहात सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांतील तणाव उफाळून आला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बदलापूर पश्चिमच्या बस डेपो परिसरात तीव्र वादाची ठिणगी पेटली आणि बाचाबाची झाली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही मुद्द्यावरून जोरदार बाचाबाची झाली, त्यानंतर ढकलाढकली प्रकार घडला, वाढत चाललेल्या तणावामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस बंदोबस्त वाढवून मतदान सुरळीत पार पाडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
- बदलापूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----
बदलापुरात शिंदेच्या शिवसेनेने खाते उघडलं, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार शीतल राऊत बिनविरोध
बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 19 च्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवार शितल राऊत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षात आनंदाचे वातावरण आहे. या प्रभागांमध्ये दोन उमेदवारांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि एका दुसऱ्या पक्षातील उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
शितल राऊत या बिनविरोध निवडून आल्यानं शिंदे शिवसेनेचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान राऊत यांच्या विजयानंतर पक्ष कार्यालयाचे ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
ADVERTISEMENT











