Maratha Reservation: मराठ्यांचं थेट PM मोदींना आव्हान... 1000 उमेदवार मोदींविरोधात वाराणसीतून भरणार फॉर्म

मुंबई तक

11 Mar 2024 (अपडेटेड: 11 Mar 2024, 10:29 PM)

Maratha Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाजाने आता थेट PM मोदींना आव्हान दिलं आहे. जर ओबीसी आरक्षण नाही मिळालं तर 1000 उमेदवार मोदींविरोधात वाराणसीतून फॉर्म भरणार असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली.

नरेंद्र मोदींविरोधात 1000 उमेदवार?

नरेंद्र मोदींविरोधात 1000 उमेदवार?

follow google news

Maratha Reservation vs PM Modi: गणेश जाधव, धाराशिव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तब्बल 1000 उमेदवार उतरविण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. अशी घोषणाच मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून हव्या असणाऱ्या आरक्षणासाठी ते सातत्याने मागणी करत आहेत. त्यासाठी आता थेट पंतप्रधान मोदींविरोधात 1000 उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. (maratha community directly challenges pm modi for obc reservation 1000 candidates will fill form from varanasi against modi)

हे वाचलं का?

1000 उमेदवार मोदींविरोधात, नेमकं काय म्हणाले विनायक पाटील?

'मराठवाड्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून हा लढा अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची दोनदा फसवणूक केली, असे असतानाही मराठा समाज गप्प राहिला, सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही.'

'वास्तविक निजाम राजवटीत मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात विलीन झाला आहे, कलम 371 नुसार मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे. कारण निजाम राजवटीत मराठा समाज हा कुणबी होता.या मागणीसाठी मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.'

हे ही वाचा>> 'लॉजसमोर शाळा.. लाज वाटली पाहिजे..', गणेश नाईक संतापले!

'1 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात आंदोलन सुरू झाले, परंतु सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, त्यानंतर मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दारात पोहोचला तेव्हा सरकारने सगेसोयरे जारी केले. मराठा समाजाचा अध्यादेश काढण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.'

'त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून 50 टक्के व्यतिरिक्त 10 टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाचा विश्वासघात केला, जे मराठा समाजाने कधीच मागितले नव्हते आणि त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.' 

'29 फेब्रुवारी, 5 मार्च आणि 9 मार्च ला मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी JEEE NEET आणि CET साठी परीक्षा दिली. परीक्षा फॉर्म ओपन पद्धतीने भरले कारण आम्ही OBC मध्येही नाही, 10% आरक्षण देऊन EWS आरक्षण संपवले आहे. यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. आता हे आम्ही सहन करणार नाही.'

हे ही वाचा>> PM मोदी येणार.. येणार पण आलेच नाही, नेमकं घडलं तरी काय?

'दिल्लीचे तख्त महाराष्ट्रात राहिले, मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजाच्या तरुणांनी दिल्लीचे तख्त हालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कलम 371 अन्वये कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य न केल्यास मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 80 तरुणांच्या अस्थिकलशांचे त्यांच्या कुटुंबीयांसह वाराणसीत गंगेच्या काठावर दशमेश घाटावर विसर्जन करण्यात येणार आहे.'

'अस्थिकलशाच्या अंत्यसंस्कारानंतर सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील अन्न-पाण्याचा त्याग करून आत्मदहन आंदोलन करणार असून विनायकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील 1000 तरुण नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार असून मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा समाज दिल्लीचे तख्त काबीज करेल.. हादरल्याशिवाय राहणार नाही.' असं विनायक पाटील यावेळी म्हणाले.

 

    follow whatsapp