Shiv Sena vs BJP: 'लॉजसमोर शाळा.. लाज वाटली पाहिजे..', गणेश नाईक संतापले; शिवसेना-भाजपमध्ये तुफान राडा!

ADVERTISEMENT

गणेश नाईक संतापले; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वाद
गणेश नाईक संतापले; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वाद
social share
google news

Shiv sena vs BJP Ganesh Naik: निलेश झालटे, नवी मुंबई: कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेतील टोकाला पोहोचलेला वाद आपण पाहिला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. महायुतीतील दोन महत्त्वाचे पक्ष असलेल्या भाजप शिवसेनेतील आणखी एक वाद आता समोर आला आहे. नवी मुंबईतल्या दिघ्यामधील एका शाळेच्या उद्घाटनावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमनेसामने आले आहेत. (after kalyan even in navi mumbai shiv sena bjp heated argument what is the dispute between mahayutti)

नेमकं घडलं तरी काय? 

दिघ्यातील या शाळेच्या मुद्द्यावरुन भाजप सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असल्याची माहिती आहे. यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. यावरुन भाजप आमदार गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

हे ही वाचा>> PM मोदी येणार.. येणार पण आलेच नाही, नेमकं घडलं तरी काय?

दिघ्यातील शाळा बनून तयार आहे. या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते व्हावं असा प्लान विजय चौगुलेंचा होता. मात्र, भाजप  कार्यकर्त्यांनी आमदार गणेश नाईकांना हस्ते या शाळेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं. यावरुन दोन्ही गटात वाद सुरु झाला आणि तो टोकाला पोहोचला. दोन गट एकमेकांशी भिडल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या वादानंतर गणेश नाईक म्हणाले की, 'हा माझा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ आहे, मी इथे येऊ शकतो. इथे काही लोक शाळेसमोर लॉज चालवत आहेत आणि अशा ठिकाणी शाळा उघडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', असं म्हटलं.. तर विजय चौगुले यांनी म्हटलं की, 'आमच्या वार्डात गणेश नाईक हुकुमशाही करत आहेत. ज्यांचे लॉज आहेत त्यांच्यावर आमदारांनी कारवाई जरुर करावी. दादागिरी आम्ही चालून देणार नाही.' असं चौगुलेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा>> Lok Sabha : राजकारणामुळे 10 वर्षांचं नातं तुटलं, नवरा-बायको निवडणुकीत आमने-सामने

दरम्यान, आता हा वाद वरिष्ठ पातळीवर कसा हाताळला जातोय याकडे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीआधी कल्याणनंतर आता नवी मुंबईत देखील भाजप-शिवसेनेत बिनसल्यानं वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरु आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT