PM मोदी येणार.. येणार पण आलेच नाही, नेमकं घडलं तरी काय?
PM Modi: आज (11 मार्च) संध्याकाळी, सूत्रांच्या हवाल्याने बातमी आली होती की, पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये ते काही मोठी घोषणा करू शकतात. मात्र, यानंतर X वर मोदींची एक पोस्ट आली. तसंच त्यांचं संबोधन होणार नाही असंही समोर आलं.
ADVERTISEMENT

PM Modi Tweet: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (सोमवार, 11 मार्च) संध्याकाळी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सुत्रांच्या हवाल्याने तशा स्वरूपाच्या बातम्या देखील येत होत्या की, पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील. यावेळी पतंप्रधान मोदी नेमकी कोणती घोषणा करणार यावर अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, अनेकांनी असंही म्हटलं की, ते नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची घोषणा करतील. मात्र, पंतप्रधान मोदी हे काही देशाला संबोधित करण्यासाठी पुढे आलेच नाही. तर त्यांच्याऐवजी फक्त त्यांचं एक ट्विट आलं.
खरं तर अवघ्या देशवासियांचं लक्ष हे मोदींच्या संबोधनाकडे लागून राहिलं होतं. पण अचानक ते संबोधित करणार नसल्याचं समोर आलं. त्यामुळे देखील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं.
हे ही वाचा>> "अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीये", शिंदेंच्या नेत्याने थोपडले दंड
पंतप्रधानांचे ट्विट- 'DRDO शास्त्रज्ञांचा अभिमान आहे'
अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या पहिल्या उड्डाण चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विटरवर (एक्स) लिहिलं,
"मिशन दिव्यस्त्र, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी बनावटीच्या विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे." असं ट्वीट मोदींनी यावेळी केलं..
दरम्यान, असं असलं तरी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करण्यासाठी का आले नाही याबाबत अद्यापही अनेक चर्चा सुरुच आहेत.