साखरपुड्याच्या आधी तिन्ही बहिणींनी एकाच वेळी सगळ्यांना हादरवलं, प्रियकरासाठी...

मुंबई तक

तीन तरुणी एकमेकींसोबत शेतात गेल्या असताना तिथे आधी एका मुलीने विष प्यायलं आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. तिला पाहून इतर दोन तरुणींनी सुद्धा विष प्राशन केलं. त्यानंतर त्या दोघांनीही विहिरीत उडी मारली.

ADVERTISEMENT

तिन्ही चुलत बहिणींनी एकाच वेळी विष प्यायलं अन्...
तिन्ही चुलत बहिणींनी एकाच वेळी विष प्यायलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साखरपुड्याच्या आधी 'त्या' दिवशी घडलं भयानक!

point

तिन्ही चुलत बहिणींनी एकाच वेळी विष प्यायलं अन्...

Suicide Case: कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तीन तरुणी एकमेकींसोबत शेतात गेल्या असताना तिथे आधी एका मुलीने विष प्यायलं आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. तिला पाहून इतर दोन तरुणींनी सुद्धा विष प्राशन केलं. त्यानंतर त्या दोघांनीही विहिरीत उडी मारली. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला. इतर दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हे प्रकरण इराबगेरा ग्रामपंचायत परिसरातील क्वारियारोड्डी गावातील असल्याची माहिती आहे. रेणुका मज्जिगे (18) असं मृत तरुणीचं नाव असून, सुनीता मज्जिगे आणि मुदुकम्मा मज्जिगे यांना तालुक्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिन्ही तरुणी चुलत बहिणी असल्याचं सांगितलं जात आहे. देवदुर्गा पोलिसांच्या तपासादरम्यान, संबंधित घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा: 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं! आधी तिला दारू पाजली अन् नंतर पाच जणांनी मिळून...

पुढच्याच आठवड्यात साखरपुडा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही तरुणींचे प्रेमसंबंध सुरू होते. घटनेतील मृत तरुणी रेणुका, तसेच सुनीता आणि मुदुकम्मा या तिघीही चुलत बहिणी होत्या. दरम्यान, रेणुकाचं लग्न दुसऱ्याच तरुणासोबत ठरलं होतं. पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. पण कुटुंबियांच्या या निर्णयामुळे तिघीही अस्वस्थ झाल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही बहिणींना आपापल्या प्रियकरांसोबतच लग्न करायचं होतं, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी प्रेमविवाह करण्यास नकार दिला असता, तिघींनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?

एकीचा मृत्यू तर दोघींची प्रकृती गंभीर 

रविवारी (14 सप्टेंबर) रेणुका, सुनीता आणि मुदुकम्मा शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आधी सुनीताने विष प्राशन केलं. सुनीता बेशुद्ध पडताच रेणुका आणि मुदुकम्मा यांनी तेच कीटकनाशक प्यायलं. दरम्यान, सुनीताचा मृत्यू झाल्याचं रेणुका आणि मुदुकम्मा यांना वाटलं. त्यामुळे दोघींनीही कसलाच विचार न करता जवळच्या विहिरीत उडी मारली. तिथल्या स्थानिकांनी यातून मुदुकम्माला वाचवलं पण, या घटनेत रेणुकाचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp