केंद्रावर जाण्यापूर्वीचं महिलेच्या नावाचं मतदान झालं, दबाव टाकताच पोस्टल करुन घेतलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Mahanagar Palika Election 2026 : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मतदानासाठी ठरलेल्या वेळेत कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पोहोचली असता, मतदार यादी तपासणीदरम्यान तिच्या नावासमोर ‘मतदान झाले आहे’ अशी नोंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला चक्रावून गेली. आपण अद्याप मतदान केलेले नाही, असे तिने ठामपणे सांगितले असतानाही मतदान यंत्रणेकडून आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

Pune Mahanagar Palika Election

Pune Mahanagar Palika Election

मुंबई तक

15 Jan 2026 (अपडेटेड: 15 Jan 2026, 03:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रावर जाण्यापूर्वीचं महिलेच्या नावाचं मतदान झालं

point

दबाव टाकताच पोस्टल करुन घेतलं

point

पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Mahanagar Palika Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल केले. यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मतदानासाठी ठरलेल्या वेळेत कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पोहोचली असता, मतदार यादी तपासणीदरम्यान तिच्या नावासमोर ‘मतदान झाले आहे’ अशी नोंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला चक्रावून गेली. आपण अद्याप मतदान केलेले नाही, असे तिने ठामपणे सांगितले असतानाही मतदान यंत्रणेकडून आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : 29 Municipal Corporations Election LIVE Updates: 29 महापालिकांसाठी आज मतदान; मतदान टक्केवारी आणि लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

या प्रकाराबाबत महिलेने आक्षेप नोंदवताच, संबंधित अधिकाऱ्यांनी तिला पोस्टल मतदानाचा पर्याय देत त्याच मार्गाने मतदान करून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, पुण्यातील किमान दोन प्रभागांमध्ये बोगस मतदान झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि संभाव्य गैरप्रकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, इतका गंभीर प्रकार समोर येऊनही प्रशासनाकडून याबाबत पोलिसांना अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोणतीही गुन्हेगारी नोंद अद्याप झालेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळेही संशय अधिक बळावला आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असताना, अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मतदानापूर्वीच एखाद्या मतदाराच्या नावावर मतदान झाल्याची नोंद आढळणे आणि त्यानंतर संबंधित मतदारालाच वेगळ्या पद्धतीने मतदान करण्यास भाग पाडणे, हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. या प्रकरणावर निवडणूक प्रशासन काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, तसेच बोगस मतदानाच्या आरोपांची चौकशी केली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

29 Municipal Corporations Election LIVE Updates: 29 महापालिकांसाठी आज मतदान; मतदान टक्केवारी आणि लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

    follow whatsapp