29 Municipal Corporations Election LIVE Updates: अर्धा तास मशीन उशिरा सुरू झालं, आता तेवढा वेळ मतदानासाठी वाढवून द्या, आमदार शंकर जगताप यांची मागणी
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडत आहे. ज्याचे लाइव्ह अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या दीर्घप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. आज (15 जानेवारी 2026) रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होतील.
राज्यातील ही निवडणूक साधारण 5 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर होत असून, मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख शहरांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील निवडणुकीचे LIVE UPDATE:
-
पिंपरी- चिंचवडमध्ये नवी सांगवी येथील प्रभाग क्रमांक 31 मधील केंद्र क्रमांक 32 येथे ईव्हीएम मशीन अर्धा तास उशिरा सुरू झालं. त्यामुळे आमदार शंकर जगताप यांनी मतदारांसाठी अधिकचा वेळ मागितला आहे. तशी मागणी त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुण्यात ईव्हीएम मशीन बंद









