A. R. Rahman on Chhaava Movie controversy divisive film : "काही चित्रपट वाईट हेतूने बनवले जातात. मी असे चित्रपट पाहणे टाळतो. मला वाटते की ‘छावा’ हा असा चित्रपट आहे, ज्याने समाजातील ध्रुवीकरणाचा, म्हणजेच समाज दोन भागांत विभागणाऱ्या वातावरणाचा काही अंशी फायदा घेतला. पण त्याचा मुख्य गाभा शौर्य दाखवणे हाच आहे आणि शेवट समाधानकारक व मनोरंजक आहे. मात्र, नक्कीच असे मला वाटतं लोकं त्यापेक्षा जास्त सजग आहेत. तुम्हाला काय वाटते, चित्रपटांचा लोकांवर खरोखर प्रभाव पडतो का? प्रत्येक माणसाकडे स्वतःची सद्ससद्विवेकबुद्धी असते, जी सत्य काय आहे हे ओळखते", असं मत सुप्रसिद्ध संगीतकार A. R. Rahman यांनी व्यक्त केले. ते बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांना छावा हा समाजात फूट पाडणारा म्हणजे विभाजन करणारा सिनेमा होता का? त्यावर ते म्हणाले, "हो, हा फूट पाडणारा सिनेमा आहे."
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई महापालिकेत मविआ सत्तेपासून 15 जागा दूर राहिली, अन् ठाकरे गट अन् काँग्रेसला 30 जागांवर मतविभाजनचा फटका
2025 मध्ये ‘छावा’ सिनेमाची छप्परफाड कमाई
अभिनेता विक्की कौशल याच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाने 2025 साली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल बादशहा औरंगजेब यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटानंतर महाराष्ट्रातील काही भागांत तणावाचे वातावरणही निर्माण झाले. आता या संपूर्ण वादावर संगीतकार ए. आर. रहमान यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
अलीकडेच बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत A. R. Rahman यांनी कबूल केले की ‘छावा’ हा असा चित्रपट आहे, ज्याने समाजातील ध्रुवीकरणाचा, म्हणजेच समाज दोन भागांत विभागणाऱ्या वातावरणाचा काही अंशी फायदा घेतला.
A. R. Rahman पुढे बोलताना म्हणाले, “चित्रपटाच्या कथेत नक्कीच काही असे घटक होते, जे विभाजन घडवणारे होते. मात्र त्यामागील मुख्य उद्देश शौर्य आणि पराक्रम दाखवणे हाच होता. मी स्वतः दिग्दर्शकाला विचारले होते की या चित्रपटासाठी त्यांना माझीच गरज का आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, या विषयाला योग्य न्याय देण्यासाठी माझ्या संगीताची आवश्यकता आहे.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











