Anant Ambani Shubh Ashirwaad : PM मोदींपासून पवारांपर्यंत...अंबानींच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला कोण कोण पोहोचलं?

Anant Ambani-Radhika Merchant Shubh Ashirwaad : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा शुक्रवारी थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यानंतर आज अंबानी कुटुंबियांनी शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित केला आहे.

आज अंबानी कुटुंबियांनी शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित केला आहे

anant ambani radhika merchant shubh ashirwad reception update pm narendra modi ncp sp sharad pawar reach

मुंबई तक

13 Jul 2024 (अपडेटेड: 13 Jul 2024, 10:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंबानी कुटुंबियांचा शुभ आशीर्वाद सोहळा सुरु

point

अंबानी कुटुंबियांकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत

point

शरद पवार प्रतिभा पवारांसह सोहळ्याला उपस्थित

Anant Ambani-Radhika Merchant Shubh Ashirwaad : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा शुक्रवारी थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यानंतर आज अंबानी कुटुंबियांनी शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावून नववधूला शुभ आशीर्वाद दिले आहेत. (anant ambani radhika merchant wedding reception update pm narendra modi ncp sp sharad pawar reach) 

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यात पोहोचले आहेत. यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत. 

 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "ठाकरेंची दोन मते फुटली", भाजप नेत्याने टाकला राजकीय बॉम्ब

शरद पवार पहिल्यांदाच अंबानीच्या कार्यक्रमात

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखीन अंबानींच्या या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थित आहेत. शरद पवारांसोबत त्यांच्या प्रतिभा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शरद पवार अंबानीच्या कार्यक्रमात आले आहे. या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आले आहेत. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला हजेरी लावली आहे. 

 

हे ही वाचा : By Poll Results : भाजपला धक्का, 'काँग्रेस'चा डंका; 13 जागांचे निकाल काय?

देशभरातील दिग्गज नेत्यांसह रामविलास पासवानचा मुलगा केंद्रीय मंत्री चिराग पासवान आपल्या आई सोबत, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस, अभिनेत्री राशी खन्ना, अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी, आलिया भट्ट, सलमान खान, उलिया वंतूर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यावर वधू वरास आशिर्वाद देण्यास उपस्थित होते.

    follow whatsapp