मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं, पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई

Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane : विज्ञान माने हे स्मृती मानधनाचे बालमित्र आहेत. त्यांनी पलाश मुच्छल यांच्यासोबत एका चित्रपटाचे सह-निर्मितीचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पासाठी मुच्छल यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचा दावा आहे; मात्र आश्वासित रक्कम न दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न मोडल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांनी काही मुलाखती दिल्या. त्या मुलाखतींमधील वक्तव्ये मानहानीकारक असल्याचा आरोप मुच्छल यांनी केला आहे.

Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane

Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 04:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं

point

पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई

Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane : मुंबई उच्च न्यायालयाने सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांना माध्यमांमधील मुलाखती व डिजिटल प्लॅटफॉर्मवर गायक पलाश मुच्छल तसेच त्यांच्या आईविरोधात कथित मानहानीकारक वक्तव्ये करण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा आदेश देताना संबंधित मुलाखतींचा आधार 23 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या घटनेशी जोडला गेला असल्याचे नमूद केले. ही घटना क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि मुच्छल यांचे ठरलेले लग्न नंतर मोडल्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. 

हे वाचलं का?

न्यायालयाने कोणते आदेश दिले? 

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांच्यात व्यावसायिक वाद असताना त्या वैयक्तिक घटनेचा संदर्भ प्रथमदर्शनी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पराग मुच्छल प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माध्यमांमधील मानहानीकारक वक्तव्यांमुळे स्वतःची आणि कुटुंबीयांची प्रतिमा गंभीररीत्या बाधित झाल्याचा आरोप पलाश मुच्छल याने केला होता. तसेच याबाबत कायमस्वरूपी मनाई आदेश व नुकसानभरपाईची मागणी करत तातडीची अंतरिम दिलासा देण्याची विनंतीही करण्यात आली होती, याबाबत पलाश मुच्छल यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. 

विज्ञान माने हे स्मृती मानधनाचे बालमित्र आहेत. त्यांनी पलाश मुच्छल यांच्यासोबत एका चित्रपटाचे सह-निर्मितीचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पासाठी मुच्छल यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचा दावा आहे; मात्र आश्वासित रक्कम न दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर मुच्छल आणि मानधना यांचे लग्न मोडल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांनी काही मुलाखती दिल्या. त्या मुलाखतींमधील वक्तव्ये मानहानीकारक असल्याचा आरोप मुच्छल यांनी केला आहे.

हेही वाचा : होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

न्यायालयाने संबंधित मुलाखतींचे ट्रान्सक्रिप्ट्स तपासून पाहिले असता, विज्ञान माने आणि पलाश मुच्छल यांच्यात व्यावसायिक वाद असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. न्यायालयाने मुच्छल यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत ते भारतीय संगीत व चित्रपट क्षेत्रातील परिचित संगीतकार व चित्रपट निर्माते असून त्यांना सहा पुरस्कार प्राप्त असल्याचेही निरीक्षण नोंदवले.

सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने प्रथमदर्शनी मजबूत केस उभी राहत असल्याचे मान्य केले. त्यानुसार, विज्ञान माने यांना संबंधित मुलाखतींमध्ये ज्या प्रकारे आणि स्वरूपात उल्लेख करण्यात आले, त्याप्रमाणे पुढील कोणतेही संदर्भ किंवा सूचक विधान करण्यास मनाई करण्यात आली आहे, जे पलाश मुच्छल व त्यांच्या आईविरोधात असून प्रथमदर्शनी मानहानीकारक ठरू शकतात.

दरम्यान, या वादाची सुरुवात सांगली येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर झाली. माने यांनी आरोप केला की, चित्रपट निर्मितीसाठी मुच्छल यांनी त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले; मात्र चित्रपट पूर्ण झाला नाही. या संदर्भातील कागदपत्रे सांगली जिल्हा पोलिसांकडे सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एका मुलाखतीत माने यांनी मुच्छल आणि स्मृती मंधाना यांचे लग्न तुटण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचा आरोपही केला होता.

या पार्श्वभूमीवर पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत विज्ञानन माने यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठविल्याचे जाहीर केले आहे. आपल्या प्रतिमा आणि कारकिर्दीला जाणूनबुजून धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने खोटे आणि मानहानीकारक आरोप केल्याचा आरोप त्यांनी नोटीसमध्ये केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?', तिघांनी मिळून केला एकाचा खून
 

    follow whatsapp