Maharashtra Weather : राज्यातील 'या' 27 जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार, हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather :1 एप्रिल 2026 रोजी काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर राहिल अशी हवामान विभागाची शक्यता आहे. अशातच मार्च महिन्यात अवकाळी पावसाचं सावट राहील असा अंदाज आहे. जाणून घ्या हवामान विभागाचा एकूण अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 01 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

1 एप्रिल 2026 रोजी काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर

point

'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर राहिल अशी हवामान विभागाची शक्यता आहे. अशातच मार्च महिन्यात अवकाळी पावसाचं सावट राहील असा अंदाज आहे. वातावरण बघता, 1 एप्रिल रोजी 7 जिल्ह्यांना ऑरेंज, तर 27 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Yo Yo Honey Singh पुन्हा अडकला वादात, मुंबईत लेझर लाइट वापरले अन्...

कोकण

कोकण विभागातील पालघर आणि मुंबईला कोणताही अलर्ट जारी केला नाही, पण काही प्रमाणात हलक्या पावसाची शक्यता आहे.  ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अशातच काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. 

मराठवाडा

मराठवाडा विभागात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : सातारा सिव्हिल रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून अंत्यसंस्कार

विदर्भ 

विदर्भ विभागात यवतमाळ या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तर अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया. नागपूर गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा आणि वाशिमला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.