Vasai Crime, प्रवीण नलावडे : क्रूरता आणि बदल्याची परिसीमा गाठणारी संतापजनक घटना वसईत समोर आली आहे. वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग एका निर्दयी व्यक्तीने चक्क चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर काढल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या त्या चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिरा रोडच्या वॉकहार्ट रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
ADVERTISEMENT
चिमुकल्यावर काढला राग
वसई पश्चिमेच्या अनुपम घर संकुल या सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच सोसायटीत राहणारा व व्यवस्याने रिक्षा चालवणारा आरोपी संदीप पवार याचा काही दिवसापूर्वी किरकोळ अंतर्गत वाद झाला होता. सोमवारी (30 मार्च) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सोसायटीतील लहान मुलं खेळत असताना, अतुल कोंढारेचा चार वर्षाचा मुलगा विघ्नेश हा देखील मुलांबरोबर खेळत होता. खेळता खेळता विघ्नेश हा रिक्षात बसला. त्याचवेळी आरोपी संदिप हा रिक्षाजवळ आला आणि त्याने इतर मुलांना हाकलून दिलं.
हे ही वाचा : 'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
कपडा धुताना आपटतात तसं..
यानंतर आरोपीने विघ्नेशला पकडून त्याचं डोकं रिक्षाच्या मीटरच्या बाजूला असलेल्या लोखंडी अँगलवरती आपटलं. त्याला रिक्षातून पायाला धरून जोरात खेचलं आणि त्याच पाय पकडून जोरात हवेत भिरकावत डोक्यावर आपटलं. एखादा कपडा धुताना आपटावा तसं त्या लहानग्या चिमुरड्याला आपटलं. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याला पायला धरुन फरफटत नेलं. आणि पहिल्या मजल्यावरील शिडीवर घेवून जावून ही मारहाण केली. विघ्नेशची आजी सोडवण्यासाठी गेली असता, तिला ही या नराधमाने मारहाण केली.
हे ही वाचा : अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यातही सहभाग, खरातच्या शिक्षक भावाला मिळाला 'खास' लाभ; केसरकरांचा पाय खोलात
'मी बदला घेतला'
सोसायटीच्या सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाले असून, याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी संदिपवर वसई पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 109(1), 115(2), 351(3), 352 सह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) 201 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याला अटक करण्यात आली आहे. संदिपला आपल्या कृत्याचं काहीही वाटत नाही. मी बदला घेतला अशा आविर्भावात तो निर्लज्जपणे सोसायटी सदस्यांना सांगत होता.
ADVERTISEMENT











