बीड : माजलगावात झोका खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला, 9 वर्षीय चिमुकलीचा गळफास लागून दुर्दैवी अंत

Beed news : एका निष्पाप मुलीच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात गळफास लागून दुर्दैवी अंत झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना मंगळवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात घडली होती. या घटनेनं शहरात खळबळ माजल्याचे वृत्त आहे. चिमुरडी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. 

Beed news

Beed news

मुंबई तक

31 Mar 2026 (अपडेटेड: 31 Mar 2026, 04:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुर्दैवाने झोक्याचा दोर वृंदाच्या गळ्याला आवळला

point

आई वरच्या मजल्यावर गेली असता, वृंदाच्या गळ्याला फास लागला

Beed News : एका निष्पाप मुलीच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात गळफास लागून दुर्दैवी अंत झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना मंगळवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात घडली होती. मृत मुलीचे नाव वृंदा समीर रुद्रवार (वय 9) असे आहे. या घटनेनं शहरात खळबळ माजल्याचे वृत्त आहे. चिमुरडी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

दुर्दैवाने झोक्याचा दोर वृंदाच्या गळ्याला आवळला

घडलेल्या घटनेनुसार, माजलगावचे प्रतिष्ठित व्यापारी प्रदीप रुद्रवारचे खंडोबा मैदान परिसरात निवासस्थान आहे. 31 मार्च 2026 रोजी महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी होती, नऊ वर्षांची वृंदा आपल्या धाकट्या बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर खेळत होती. झोका खेळण्यासाठी ती झोक्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचदरम्यान तिने एका खुर्चीचा आधार घेतला. अशातच अचानकपणे खुर्ची निसटली आणि दुर्दैवाने झोक्याचा दोर वृंदाच्या गळ्याला आवळला गेला. 

आई वरच्या मजल्यावर गेली असता, वृंदाच्या गळ्याला फास लागला

बराच वेळ झालं वृंदा जेवणासाठी खाली आली नाही, हेच बघण्यासाठी आई वरच्या मजल्यावर गेली. वृंदाच्या गळ्याला फास बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली, तसेच आईनं किंकाळी फोडली. तिच्या आर्त किंकाळ्या ऐकून वृंदाचे आजोबा, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना तात्काळपणे वरच्या मजल्यावर धावले. नंतर वृंदाला रुग्णालयात दजाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

हे ही वाचा : मुंबईसह ठाणे लोकसभेची श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी, नरेश म्हस्के यांना संधी, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची यादी समोर

प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ती सर्वांचीच लाडकी होती. सुट्टीचा आनंद घेत असतानाच, नियतीने निष्पाप मुलीवर घाला घातला. या घटनेनं रुद्रवार कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले. या घटनेने पुन्हा एकदा, मुले घरात खेळत असताना त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले आहे.