मुंबईची खबर : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामाला वेग, अनेक इमारतींचे पाडकाम सुरु; लवकरच मुंबईकरांना मिळणार खुशखबर

वरळी ते शिवडी या उन्नत मार्गाच्या कामाला वेग आला आहे. सप्टेंबरअखेर हा मार्ग पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

Worli Sewri Elevated Road

Worli Sewri Elevated Road

मुंबई तक

01 Apr 2026 (अपडेटेड: 01 Apr 2026, 09:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामाला वेग

point

अनेक इमारतींचे पाडकाम सुरु

point

लवकरच मुंबईकरांना मिळणार खुशखबर

Worli Sewri Elevated Road : दक्षिण मुंबईसाठी वरळी-शिवडी हा उन्नत मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गाचा मुख्य उद्देश दक्षिण मुंबईतून अटल सेतूला विना अडथळा आणि अतिजलद जाता यावे असा आहे. मात्र या मार्गात येणारी घरे आणि इमारती यामुळे या प्रकल्पाला वेळ लागत आहे. मात्र यामधील काही अडथळे सध्या दूर होताना पहायला मिळत आहेत. यामुळे सध्या या प्रकल्पाला वेग आल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.  हा प्रकल्प नेमका काय आहे आणि यामुळे मुंबईकरांना काय फायदा होणार आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

भूसंपादनाला वेग

वरळी ते शिवडी हा उन्नत मार्ग सर्वाधिक चर्चेत असलेला मार्ग आहे. दक्षिण मुंबईसाठी हा अतिशय महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी मार्ग असल्याचे बोलले जात आहे.  यासाठी प्रभादेवी याठिकाणी डबलडेक उड्डाणपूल उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी प्रभादेवीतील जुन्या उड्डाणपूलाचं पाडकाम सुरु आहे. हा जुना उड्डाणपूल जवळपास 100 वर्ष जुना आहे. मात्र हा उड्डाणपूल पाडताना दोन इमारती पाडणे गरजेचे होते. यासाठी आता  या इमारतीतील नागरिकांचे पुनर्वसन करुन ह्या दोन इमारती पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या कामाला आता वेग येणार असल्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा : April Fool नाही बरं... आजपासून बदलणार 8 मोठे नियम, पगारामध्ये तुम्हाला बसणार मोठा धक्का!

या मार्गांना जोडणार उड्डाणपूल

प्रभादेवी येथे होणारा नवा उड्डाणपूल हा सेनापती बापट मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या दोन मार्गांना जोडेल. दोन दिशांना जोडणारा हा डबलडेकर उड्डाणपूल असून एक भाग वांद्रे-वरळी सी-लिंकला, तर दुसरा भाग शिवडी येथील अटल सेतूला जोडेल.

हे ही वाचा : मुंबई महानगरपालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, 'मेट्रोवुमन' अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत?

दरम्यान, प्रभादेवी उड्डाणपूलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या लक्ष्मी निवास या इमारतीतील रहिवाशांना कायमस्वरुपी घरे वितरित करण्याता आली आहेत. ही इमारत सध्या रिकामी करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या नियोजनानुसार सप्टेंबर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.