'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘एक दूजे के लिए’ मधून केला होता डेब्यू

Actor Sunil Thapa Passes Away : सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक बहुरंगी कलाकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. 1981 मध्ये ‘एक दूजे के लिए’ या गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री मुख्य भूमिकेत होते.

Actor Bollywood News

Actor Bollywood News

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 04:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

point

वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Sunil Thapa Passes Away : नेपाळी प्रेक्षकांमध्ये ‘राते काइला’ या नावाने घराघरात ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नेपाळसह भारतातील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुनील थापा यांनी केवळ नेपाळीच नव्हे तर बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमांत काम केलं होतं. त्यांच्या कुटुंबातील सदस्य काठमांडू येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या निधनाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक बहुरंगी कलाकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. 1981 मध्ये ‘एक दूजे के लिए’ या गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री मुख्य भूमिकेत होते. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटात सुनील थापा यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा? आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं

यानंतर त्यांना सलग अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. 1982 मध्ये ‘मशाल’ या चित्रपटातून त्यांनी नेपाली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र सुरुवातीला त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर आलेल्या ‘चिनो’ या चित्रपटाने त्यांचे करिअरच बदलून टाकले. या चित्रपटात त्यांनी साकारलेला ‘राते काइला’* हा खलनायक प्रचंड लोकप्रिय ठरला. ‘चिनो’ला आजही नेपाली सिनेमाचा ‘शोले’ म्हटले जाते. या भूमिकेमुळे सुनील थापा यांना नेपाळचा ‘गब्बर’ अशी ओळख मिळाली.

सुनील थापा यांनी केवळ खलनायक म्हणूनच नव्हे तर विविध छटांच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 2014 मध्ये आलेल्या ‘मैरी कॉम’ या हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. कठोर पण प्रेरणादायी प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी त्यांना प्रचंड प्रशंसा मिळाली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, हा रोल सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि डॅनी डेन्झोंग्पा यांना ऑफर करण्यात आला होता, मात्र अखेरीस तो त्यांच्या वाट्याला आला. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

नेपाली, हिंदी आणि भोजपुरी सिनेमात मोलाचे योगदान देणारे सुनील थापा हे उत्तम शिक्षकही होते. त्यांनी ‘एव्हरेस्ट फिल्म अकॅडमी’ सुरू केली होती. या अकॅडमीमध्ये ते केवळ अभिनयाचे धडे देत नसत, तर शिस्त, वेळेचे महत्त्व आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा यांचाही संस्कार करत असत. त्यांच्या निधनाने एक कलाकार, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान हरपले आहे. सुनील थापा यांच्या आठवणी आणि त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहतील.
 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन् रेल्वे ट्रॅकवर तुकड्यांमध्ये तरुणाचा मृतदेह...

    follow whatsapp