Asha Bhosale : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 11 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहेस तसेच संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भारतीय संगीतातील तेजस्वी तारा निखळला, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
कसं होतं आशा भोसले यांचं आयुष्य?
आशा भोसले या दिवंगत महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण होत्या. आपल्या मोठ्या बहिणीला पाहून त्यांनी देखील संगीत क्षेत्रात आपलं नावलौकिक केलं. आपल्या संगीत क्षेत्राच्या कारकिर्दित त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 12 हजार गाणी गायली, त्यांच्या या कामगिरीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची नोंद घेतली.
पार्टीमध्ये लोकप्रिय असलेले 'पिया तू अब तो आजा' असो किंवा 'दिल चीज क्या है' ही कव्वाली असो, आशा भोसले यांचे प्रत्येक गाणे अजरामर आहे. वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर, 1943 साली त्यांनी गायन क्षेत्राला सुरुवात केली. कुटुंबाला आधार देण्यासाठी, आशा यांनी आपली मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत गाणी गाण्यास सुरुवात केली.
'या' मराठी चित्रपटात गायले पहिले गाणे
आशा भोसलेंचं पहिलं मराठी गाणं हे 1943 साली 'माझा बाळ' या मराठी चित्रपटात गायले होते, तेव्हा त्या फक्त 10 वर्षाच्या होत्या. त्यांनी एका वृत्तवाहिनीला आपल्या पहिल्या गाण्याच्या अनुभवाबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ''मला माझे पहिले गाणे मायक्रोफोनसमोर उभे राहून रेकॉर्ड करावे लागते. माझे अंग थरथरत होते. मायक्रोफोन म्हणजे काय हे मला माहिती नव्हते, माझ्या मनात तो विचारही आला नव्हता. वडिलांनी त्यांची गाणी रेकॉर्ड केली होती. तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आणि आज इथे आहे.''
16 व्या वर्षी विवाह
आशा भोसले यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायन कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांचे पहिले बॉलिवूड गाणे 1947 साली चुनरिया चित्रपटात होते. तेव्हापासून नंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक छोट्या चित्रपटांमध्ये गाणी गायली. नंतर वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी बहीण लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले, निर्णयामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते.
1957 मध्ये व्यावसायिक यशाची सुरुवात
त्यांच्या व्यावसायिक यशाची सुरुवात ही 1957 मध्ये झाली. मोहम्मद रफी यांच्यासोबत गाजलेले त्यांचे 'उडे जब जब झुल्फे तेरी' हे गाणे प्रचंड गाजले. यानंतर आशा भोसले यांना अधिक ओळख मिळू लागली होती. पण, काही काळानंतर गायिकेनं आपल्या मुलासह पतीचे घर सोडले. 1950 ते 1980 च्या दशकात आशा भोसले यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली. नंतर 90 चे दशक आल्यानंतर ए.आर. रहमान यांनी रंगीला चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी त्यांची निवड केली. हे गाणे काही ठिकाणी ऐकले जाते आणि लोकांना देखील आवडते.
हे ही वाचा : 'सुरांची बाग उजाड झाली..' आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक; रोहित पवारांनीही व्यक्त केला शोक
आशा भोसले आणि त्यांची बहीण लता मंगेशकर यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. मात्र, व्यावसायिक पातळीवर त्यांच्यात एक प्रकारची स्पर्धाही होती. तरीही, त्यांची गाणी एकमेकांपेक्षा वेगळी राहिली होती.
ADVERTISEMENT











