'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड, कोणत्या कारणाने मृत्यू?

Asrani passed away : 'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड, कोणत्या कारणाने मृत्यू? सिनेसृष्टी हळहळली

Mumbai Tak

मुंबई तक

21 Oct 2025 (अपडेटेड: 21 Oct 2025, 08:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड

point

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली

Asrani passed away : ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे सोमवारी दुपारी मुंबईत निधन झाले. 84 वर्षांचे असरानी हे त्यांच्या  विनोदी भूमिकांसाठी आणि शोले चित्रपटातील प्रसिद्ध संवाद “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” साठी ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांना काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रास होत असल्यामुळे त्यांना जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

असरानी यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या निधनामागील खरं कारणेही समोर आली आहेत.

असरानी यांच्या निधनाचं कारण

त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी पीटीआयशी बोलताना या बातमीची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं, “ते गेले काही दिवस अस्वस्थ होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नंतर सांगितलं की त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साचलं आहे. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास त्यांचं निधन झालं.” असरानी यांच्यावर त्याच दिवशी संध्याकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी त्यांचे जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.

असरानी यांचा सिनेसृष्टीतील प्रवास 

जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी 1960 च्या दशकात अभिनय सुरू करण्यापूर्वी पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII)मध्ये प्रशिक्षण घेतले होते. 1960च्या दशकात करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांनी पाच दशकांहून अधिक काळात 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

कॉमेडी व्यतिरिक्त त्यांनी गंभीर भूमिका आणि सहाय्यक भूमिका देखील सहजतेने साकारल्या. नमक हराम, बावर्ची, गुड्डी, चुप चुप के, हेरा फेरी, हलचल, दीवाने हुए पागल आणि वेलकम सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बदलत्या सिनेमाच्या काळानुसार स्वतःला जुळवून घेण्याची असरानी यांची क्षमता त्यांना अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये स्थान देऊन गेली, ज्यांचा विनोद प्रत्येक पिढीत तितकाच गाजत राहिला. त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर आज की ताज़ा खबर आणि चला मुरारी हीरो बनने या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.

शोलेतील ‘जेलर’ची भूमिका ठरली सर्वात लोकप्रिय

असरानी यांनी आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीने लोकांना हसवण्याच्या अद्वितीय शैलीमुळे भारतीय सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली. रमेश सिप्पी यांच्या शोले (1975) या चित्रपटातील ‘सनकी जेलर’ही त्यांची भूमिका आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लक्षवेधी आणि आवडती कॉमिक परफॉर्मन्स मानली जाते. हे पात्र चार्ली चॅप्लिन यांच्या The Great Dictator मधील भूमिकेपासून प्रेरित होतं, आणि असरानी यांनी त्याला भारतीय विनोदाच्या रंगात रंगवून अविस्मरणीय बनवलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं
 

    follow whatsapp