Ramraje Naik Nimbalkar, सातारा : फलटण येथे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये पदवीधर नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबाबत रामराजे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी फसवू नका, असा सल्ला दिला आहे. शिवाय यावेळी रामराजे निंबाळकर यांनी पक्ष बदलाबाबतही भाष्य केलं.
ADVERTISEMENT
रामराजे निंबाळकर म्हणाले, मी बोलतो ते स्पष्ट बोलतो.मी ठरवेल कोणत्या पार्टीत जायचं ते.नाहीतर तुम्ही ठरवा कोणत्या पार्टीत जायचं. यावर आपण मतदान घेऊ.. बघू सर्वांचे एकमत होतंय का पाहू. कोणत्या पार्टीत जायचं हे माझं मी ठरवीन 30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो.. कोणीही अस्वस्थ होऊ नका. मला फसवायचा प्रयत्न केला तर सुट्टी देणार नाही. तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा, असा सल्लाही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर हादरलं, भावजी घरी आलेला दिसताच मेहुण्याने डोक्यात पक्कड घातली, जागेवर संपवलं
फलटण तालुक्यात 2019 पासून राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडू लागले आहेत. सत्तेच्या नावाखाली दबावाची भाषा आणि धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप होत आहे. “कॉन्ट्रॅक्टर असाल तर बिलं रोखतो, टेंडर मागू नका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील” अशा पद्धतीचे वाक्य वापरले जात असल्याची चर्चा आहे. वाळू तस्करी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तब्बल दीड-दीड कोटींचे दंड ठोठावले जातात, पोलिसांचा वापर करून धमकावले जाते, आणि विरोधकांवर खोट्या गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल केल्या जातात. या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः अनुभवल्या आहेत. मात्र, आम्ही सत्तेत असताना कधीही आमच्या विरोधकांना छळले नाही, कारण असा संस्कार आमच्यात नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.
जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. ते गेले म्हणजे संपलेच, असे म्हणत त्यावर पडदा टाकण्यात आला. “संध्याकाळी एक यादी काढा, थंड पाण्याने आंघोळ करा आणि ‘ओम शांती’ म्हणा,” असा उपरोधिक टोला लगावण्यात आला.
धरण झालं नसतं, तर पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनच बसवता आली नसती, असंही स्पष्ट करण्यात आलं. तरुण पिढीने दुष्काळाचे दिवस पाहिले नाहीत, त्यामुळे आज ते कालव्यात डुंबत आहेत, त्यांना त्या काळाची जाणीव नाही, असं नमूद करण्यात आलं. यासोबतच “श्रीराम साखर कारखाना वाचवला नसता, तर आज काय परिस्थिती निर्माण झाली असती?” असा थेट सवाल रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापुरात वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, मृतदेह धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेला
ADVERTISEMENT
