Video : ख्रिसमस पार्टी महागात पडणार, अभिनेता रणबीर कपूर विरोधात पोलिसात तक्रार

खरं तर रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत रणबीर कपूर दारू टाकलेल्या केकला आग लावत आहेत.

bollywood actor ranbir kapoor says jay mata ji cutting liquor cake advocate files complaint animal movie

bollywood actor ranbir kapoor says jay mata ji cutting liquor cake advocate files complaint animal movie

प्रशांत गोमाणे

• 05:00 AM • 28 Dec 2023

follow google news

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या अॅनिमल (Animal Movie) सिनेमामुळे चर्चेत आहे. रणबीरच्या या सिनेमाची प्रशंसाही होतेय आणि त्यावर टीका देखील करण्यात येत आहे. असे असतानाच आता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात आता पोलीस ठाण्यात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे (viral Video) त्याच्यावरही तक्रार झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि त्या व्हायरल व्हिडिओत नेमकं असं काय आहे,ज्यामुळे त्याच्यावर तक्रार झाली आहे. हे जाणून घेऊयात. (bollywood actor ranbir kapoor viral video says jay mata ji cutting liquor cake advocate files complaint animal movie)

हे वाचलं का?

जगभरात सध्या ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू आहे. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड देखील बुडाला आहे. बॉलिवूड अभिनेते,अभिनेत्री देखील ख्रिसमस पार्टीत दंग झाले आहेत. बॉलिवूडचा अॅनिमल फेम अभिनेता रणबीर कपूर देखील अशाच पार्टीत दंग झाला आहे. या पार्टीत तो देहभान विसरून सेलिब्रेशन करतोय. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील रणबीरच्या या कृतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. आणि त्या विरोधातच एका वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?

खरं तर रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत रणबीर कपूर दारू टाकलेल्या केकला आग लावत आहेत. या दरम्यानच रणबीर कपूर ‘जय माती दी’च्या घोषणा देत आहेत, असा दावा वकिलाने करत आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वकिलाने घाटकोपर पोलिसात तक्रार दाखल करून अभिनेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

वकिलाने कलम 295A (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांचा हेतुपुरस्सर अपमान करणे), 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कोणताही शब्द वापरणे), 500 (अपमानित करणे) आणि 34 (सामान्य हेतूने पुढे करणे) आहेत. या कलमाअंतर्गत एफआयआर दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र अद्याप तरी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

हे ही वाचा : नाना पाटेकर निवडणूक लढविणार का? शरद पवारांच्या विधानाने…

दरम्यान दोनच दिवसापूर्वी रणबीर आलीयाने क्रिसमसच्या मुहूर्तावर त्यांची मुलगी राहा कपूरला मीडीयासमोर आणले होते. यावेळी सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकुळ घातला होता. राहा आता एका वर्षांची झाली आहे. तिचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    follow whatsapp