Epstein files मध्ये बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकाचं नाव? सोशल मीडियावरील चर्चेमुळे संतापला; समोर येऊन थेट बोलला

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 11:11 AM)

Bollywood News : “मला याबाबत काहीच माहिती नाही. मला दर महिन्याला वक्ता म्हणून सुमारे 15 आमंत्रणं येतात. त्यापैकी फारच कमी आमंत्रणांना मी प्रतिसाद देतो. शिवाय, मी आयुष्यात कधीही बीजिंगला गेलेलो नाही,” असं सांगत कश्यप यांनी या दाव्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

Bollywood News

Bollywood News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एपस्टीन फाइल्समध्ये बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकाचं नाव?

point

सोशल मीडियावरील चर्चेमुळे संतापला; समोर येऊन थेट बोलला

Bollywood News : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचं नाव जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्समध्ये आल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर करण्यात येतोय. मात्र, हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत अनुराग कश्यप यांनी त्यांचा ठाम शब्दांत इन्कार केला आहे. ऑनलाईन फिरत असलेल्या काही कागदपत्रांमध्ये त्यांचं नाव असल्याचं म्हटलं जात असलं, तरी ही कागदपत्रं अद्याप अधिकृतरित्या पडताळलेली नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

या कागदपत्रांमध्ये कथितरित्या “एक बॉलीवूड व्यक्ती” आणि “एक प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक” असा उल्लेख आहे. या व्यक्तीचा 2017 साली चीनमधील बीजिंग येथे होणाऱ्या एका कार्यक्रमाशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या चर्चांवर उत्तर देताना अनुराग कश्यप यांनी HT City शी थेट संवाद साधला.

हेही वाचा : 'वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा..' परदेशी क्रिकेट बोर्डाची टिप्पणी; नेमकं काय घडलं?

मी आयुष्यात कधीही बीजिंगला गेलेलो नाही - अनुराग कश्यप 

“मला याबाबत काहीच माहिती नाही. मला दर महिन्याला वक्ता म्हणून सुमारे 15 आमंत्रणं येतात. त्यापैकी फारच कमी आमंत्रणांना मी प्रतिसाद देतो. शिवाय, मी आयुष्यात कधीही बीजिंगला गेलेलो नाही,” असं सांगत कश्यप यांनी या दाव्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

या दस्तऐवजांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत कश्यप म्हणाले की, हे सगळे दावे फक्त सनसनाटी मथळ्यांमुळे पसरवले जात आहेत. “तो एखादा साधा, कुठलातरी ईमेल आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. माझ्या नावावरचे क्लिकबेट्स माझ्या चित्रपटांपेक्षा जास्त चालतात,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, एपस्टीन फाइल्समुळे गेल्या काही आठवड्यांपासून जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात गुन्हेगार असलेला जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं या फाइल्समध्ये समोर येत आहेत. यात कागदपत्रं, छायाचित्रं आणि ईमेल्सचा समावेश असून, त्यापैकी अनेकांची अद्याप पडताळणी झालेली नाही. या प्रकरणात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासह अनेक नामवंतांनी खुलासे केले आहेत. या अफवांमुळे अनुराग कश्यप सध्या माध्यमांच्या चर्चेत आले आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या स्पष्ट प्रतिक्रियेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळावा, अशीच त्यांची भूमिका दिसून येते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

परिक्षेला निघाली होती, पण शाळेत पोहोचताच आलं नाही; आठवीच्या विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर