महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त, मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले; कोणी केली मदत?

Marathwada Flood : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पुढे आले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Sep 2025 (अपडेटेड: 27 Sep 2025, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा फटका बसलाय

point

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले आहेत

Marathwada Flood : गेल्या 15 दिवसांपासून मराठवाड्यातील ढगफुटीसदृश्य पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सतत सुरु असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. महापूराने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हेरावून घेतलाय. तर मराठवाड्यातील अनेक लोकांना महापूरामुळे जीव गमवावा लागलाय. शिवाय, अनेक जनावरं देखील मृत्यूमुखी पडली आहे. दरम्यान, संपूर्ण मराठवाडा महापूराच्या संकटात सापडला असताना आता मराठी कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. शेतकऱ्यांना कोण कोणत्या कलाकारांनी मदत करण्यास सुरुवात केलीये? जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोण कोणत्या कलाकरांनी मदत केली? 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रथम ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपूरे पुढे आले होते. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करणार असल्याचं सांगितलं. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या फेसबुकवर एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. दरम्यान या दोघांशिवाय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. 

नाना पाटेकर म्हणाले, तीस जिल्हे महापूरामुळे बाधित आहेत. मराठवाडा आणि सोलापूर जास्त करुन आहे. हानी भरुन न येण्यासारखी आहे. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. आपण आपल्या परीने काय करता येईल ते पाहूयात. आम्ही नाम फाऊंडेशनच्या वतीने मदत करत आहोत. 

मकरंद अनासपुरे म्हणाले, कोणीही खचून जाऊ नये. यातून अविचार करु नये, असं आवाहन आम्ही नाम फाऊंडेशनच्या वतीने करतो. आम्ही किराणा किटच्या माध्यमातून आम्ही मदत सुरु केली आहे. 

प्रवीण तरडे यांनी शेअर केला व्हिडीओ 

प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी  झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडात आलेले सोयाबीन, तूर, कापूस, उडीद ही पिके पूर्ण पाण्यामध्ये बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा विदर्भ व खानदेश या भागामध्ये प्रामुख्याने या सर्व पावसाचा मोठा तडाका जाणवतोय. 

“करोना संकट, वाढलेली महागाई, पिकांची चिंता, शेतमालाचे पडलेले भाव, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा तसा विचार करू नका. हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका,” असं आवाहन शिवार संसदने केले आहे.

“शिवार हेल्पलाइनद्वारे समुपदेशन, मदत, सल्ला व मार्गदर्शन तात्काळ  स्वरूपात करण्यात येईल. आत्ताच्या परिस्थितीनंतरही भविष्यात कधीही कोणत्याही परिस्थितीत मदत लागल्यास फक्त शिवार हेल्पलाइनला 8955771115 एक फोन करा,” असे आवाहन अभिनेते प्रविण तरडे व  शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा : खोलीत बंद केलं अन् वारंवार भिंतीवर डोकं आपटत... 2 वर्षांच्या मुलासोबत वडिलांचं निर्घृण कृत्य! नंतर स्वत:वर सुद्धा...

    follow whatsapp