ओळख नसतानाही किरकोळ कारणावरुन वाद, 13 वर्षीय मुलाने 15 वर्षीय मुलाला जागेवर संपवलं

Crime News : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर 13 वर्षीय मुलाने 15 वर्षीय मुलाची हत्या केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Sep 2025 (अपडेटेड: 27 Sep 2025, 02:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

किरकोळ कारणावरुन 15 वर्षीय मुलाचा खून करण्यात आलाय

point

13 वर्षीय मुलाने 15 वर्षीय मुलाल संपवलंय

Crime News : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर 13 वर्षीय मुलाने 15 वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना घडलीये. हा प्रकार दिल्लीतून समोर आला असून अल्पवयीन मुलाने हत्या करण्यासाठी धारदार चाकूचा वापर केलाय. ही घटना दिल्लीतील सीलमपूर भागात घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुन्हेगारी प्रचंड वाढली असून सातत्याने अशा घटना समोर येत आहेत. करण असं हत्या झालेल्या मुलाचे नाव असून आरोपी मुलाचे वय केवळ 13 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडलीये. 

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, 13 वर्षीय मुलाचा करणसोबत काहीतरी वाद झाला होता. या वादानंतरच त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. 

Govt Job: पदवीधरांसाठी खुशखबर! 'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती... कधीपर्यंत कराल अप्लाय?

रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू

धारदार शस्त्राने वार केल्यानंतर जखमी झालेल्या करणला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. 15 वर्षीय करण न्यू सीलमपूर परिसरातील राहिवासी होता. तो एका मेकॅनिकच्या दुकानात रिपेअरिंगचे काम शिकत होता. पोलिसांकडून घटनेमागील कारण शोधले जात आहे.

खळबळजनक... शिंदेंच्या नेत्यासह त्याच्या मुलाला ठार करण्यासाठी पवारांच्या NCP नेत्याकडून 4 कोटीची सुपारी?

वडील तेजपाल यांनी सांगितले सत्य

पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु केलंय. तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. करणचे वडील तेजपाल सैनी गुरुग्राममध्ये नोकरी करतात. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शिक्षण सोडून मेकॅनिकचे काम शिकत होता. तेजपाल यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी दुकानमालकाने करणला 500 रुपयांचे सुटे पैसे आणण्यासाठी पाठवले होते. दरम्यान गल्लीत काही अल्पवयीन मुलांशी त्याचा वाद झाला. त्यात एका आरोपीने करणच्या गळ्यात हात घालून त्याच्या छातीवर चाकू खुपसला. आरोपीशी त्यांचा किंवा त्यांच्या मुलाचा पूर्वी कधीही संबंध नव्हता, त्यामुळे जुना वाद असण्याचा प्रश्नच येत नाही. आरोपी नुकताच त्या भागात राहायला आला होता. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    follow whatsapp