Crime News: अनैतिक संबंध, वाद आणि हत्या... अशा प्रकारच्या बऱ्याच घटना सध्या घडत असल्याचं पाहायला मिळतंय. मध्य प्रदेशातील बडवानीमध्ये सुद्धा नातेसंबंधांना काळीमा फासणारी अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दीर आणि वहिनीच्या अनैतिक संबंधातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. 20 सप्टेंबर रोजी राजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील खडकल गावाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. अजय पवार अशी मृत तरुणाची ओळख असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
पोलिसांनी साक्षीदार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे, प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, मृताची पत्नी छाया आणि दीर सुमित पवार या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर, पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली. हत्येमागचं खरं कारण ऐकून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
अजयने पत्नीला गावी नेलं अन् नंतर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छाया आणि आरोपी सुमित यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून अनैतिक संबंध सुरू होते. आरोपी महिलेच्या पतीला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाली. त्यावेळी, पीडित अजयने त्याच्या पत्नीसह कुटुंबियांना इंदौरच्या विदुर नगर हवा बंगला येथून खडकल गावात शिफ्ट केलं. 19 सप्टेंबर रोजी अजय कामानिमित्त इंदौरमध्ये गेला होता. त्या दिवशी काम पूर्ण करून तो पुन्हा आपल्या गावी येत होता. सुमितला याबद्दल कळताच त्याने एक गाडी भाड्याने घेतली आणि अजयला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडलं. वाटेत त्याने मानपूर दारूच्या दुकानातून बिअर खरेदी केली आणि खडकल गावाबाहेर आरोपीने अजयला दारू प्यायला दिली, दारू प्यायल्याने तो गाडीतच अजय गाडीतच झोपला.
हे ही वाचा: ठाणे: "मी परत कधीच येणार नाही, मुलांकडे लक्ष दे..." पत्नीला फोनवर सांगितली 'ती' गोष्ट; नंतर नदीत उडी मारली अन्...
हात-पाय बांधून ओढत नेलं आणि कालव्यात फेकलं
त्या काळात, सुमितने आपल्या घरी गेला आणि गाडी खराब झाल्याचा बहाणा सांगून दोरी घेऊन आला. त्यावेळी त्याने छायाला सुद्धा इशारा केला. छाया आणि सुमित दोघेही गाडीजवळ पोहोचले. सुमितने अजयचा काटा काढण्याचं ठरवलं आणि अजयच्या या निर्णयाला छायाने सुद्धा होकार दिला. त्यावेळी, अजयला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवण्यात आलं आणि त्याच्यावर मागून दगड फेकून त्याला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर आरोपींनी त्याला दोरीने बांधून ठेवलं आणि नंतर कालव्याच्या दिशेने ओढत नेलं. त्यानंतर, आरोपीने अजयला कालव्यात फेकून दिलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सकाळ होताच सुमित इंदौरला पळून गेला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एकाच अॅपवरून काढता येणार मेट्रोची सर्व तिकीटे... कसं ते जाणून घ्या
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे हत्येमागचं सत्य उघडकीस आलं. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
