मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एकाच अॅपवरून काढता येणार मेट्रोची सर्व तिकीटे... कसं ते जाणून घ्या
प्रवाशांना आता एकाच अॅपच्या माध्यमातून मुंबईतील तिन्ही मेट्रो लाइनची तिकीटे खरेदी करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

आता एकाच अॅपवरून काढता येणार मेट्रोची सर्व तिकीटे...

काय आहे नवीन डिजिटल तिकीट प्रणाली
Mumbai News: मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रवाशांना आता एकाच अॅपच्या माध्यमातून मुंबईतील तिन्ही मेट्रो लाइनची तिकीटे खरेदी करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
खरंतर, आतापर्यंत अशा कोणत्याच एका अॅपवर मुंबईतील तिन्ही मेट्रो लाइनच्या तिकीटांची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे, प्रवाशांना वेगवेगळ्या अॅपवरून किंवा तिकीट काउंटरवर लाइनमध्ये उभं राहून तिकीट काढावं लागत होतं. परंत, आता 'वन तिकीट' अॅपच्या माध्यमातून लोक सहजपणे एका मेट्रोतून उतरून दुसऱ्या मेट्रोने प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगळं तिकीट खरेदी करण्याचं टेन्शन कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मेट्रो-1 च्या सहयोगाने 'वन तिकीट' अॅपला ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं गेलं आहे. जून 2025 मध्ये मेट्रो- 3 कॉरिडोर साठी हे अॅप लॉन्च केलं गेलं होतं. या अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हे अॅप अपडेट करून लॉन्च केलं गेलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: काय सांगता? रेल्वेत 8000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती! 'या' पदांसाठी लवकरच करा अप्लाय...
दररोज 9 लाख प्रवाशांना दिलासा
मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन कडून मुंबई मेट्रो-7, मेट्रो 2 A चं संचालन केलं जातं. तसेच, मेट्रो 3 हे एमएमआरसी (MMRC) आणि मेट्रो 1 हे मेट्रो 1 प्रशासनाकडून चालवत असल्याची माहिती आहे. आता मेट्रो प्रवासी प्ले स्टोअर किंवा आयओएस (IOS) प्लॅटफॉर्मवरून अॅप डाउनलोड करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. खरंतर, मेट्रोच्या तिन्ही लाइनवरून दररोज जवळपास 9 लाख नागरिक प्रवास करत असल्याची माहिती आहे.