आर्यन खानची वेब सीरिज वादाच्या विळख्यात! समीर वानखेडेंनी दाखल केला खटला... 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' चर्चेत
आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी या वेब सीरिजविरुद्ध खटला दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आर्यन खानची वेबसीरिज वादाच्या विळख्यात!

आर्यन खानची वेब सीरिजविरुद्ध समीर वानखेडेंनी दाखल केला खटला...

'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' आता वेगळ्याच चर्चेत
Aryan Khan web series in controversy: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केली 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' ही वेब सीरिज सध्या वादाच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) विरुद्ध दिल्ली हायकोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि अपमानास्पद बाबी
समीर वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत वेब सिरीजविरुद्ध कायमस्वरूपी बंदीचे (Permanent & Mandatory Injunction) आदेश आणि नुकसानभरपाई (Damages)ची मागणी केली आहे. अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीची रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजमधून खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि अपमानास्पद बाबी सादर करण्यात आल्या आल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. तसेच, या सीरिजच्या माध्यमातून मादक पदार्थांच्या विरोधात अंमलबजावणी संस्थांना नकारात्मक आणि अपमानास्पद पद्धतीने चित्रित केलं असून अशा प्रकारच्या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमजोर होत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांची चिंताच मिटली! भारत सरकारच्या कंपनीत मिळवा नोकरी, कधीपर्यंत कराल अर्ज?
समीर वानखेडे यांच्या मते, या वेब सीरिजमध्ये जाणूनबुजून त्यांच्याविरुद्ध पक्षपाती आणि अपमानास्पद कंटेट दाखवण्यात आला आहे. समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित हा खटला सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयात प्रलंबित आहे.
राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेल्या घोषणेचा अपमान
वानखेडे यांचा आणखी एक असा आरोप आहे की वेब सीरिजमध्ये एक पात्र "सत्यमेव जयते" म्हणताना दाखवलं आहे, पण त्यानंतर लगेच ती व्यक्ती अश्लील हावभाव करताना दिसून येत आहे. असं कृत्य राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेल्या घोषणेचा अपमान असून तो राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत दंडनीय गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.