शेजारी राहणाऱ्या तरुणीला अंघोळ करताना बघायचे होते, तरुणाने तिच्या बाथरुममध्ये लावला हिडन कॅमेरा, नंतर रोजच...

Crime news : एका शेजारी राहणाऱ्या भाडेकरूने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या बाथरुममध्ये एक हिडन कॅमेरा लावला होता. तरुणाला तिला विवस्त्र बघायचं असल्याने तरुणाने असे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

hidden camera in bathroom

hidden camera in bathroom

मुंबई तक

25 Sep 2025 (अपडेटेड: 25 Sep 2025, 01:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीच्या बाथरुममध्ये हिडन कॅमेरा

point

तरुणीनं पाहताच भयंकर...

Crime news : आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील वातावरण चांगलं असावं असे अनेकांना वाटते. तसेच शेजारी राहणाऱ्या कुटुंबाचे आपल्याप्रती चांगलं वर्तन असावं असे अनेकांना वाटते. पण, जर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचं वर्तन हे चुकीचं असेल तर त्याचा अनेकदा शेजाऱ्याला त्रास सहन करावा लागतो. असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या एका भाडेकरूने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या बाथरुममध्ये एक हिडन कॅमेरा लावला होता. तरुणाला तिला विवस्त्र बघायचं असल्याने तरुणाने असे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर 126 पोलीस ठाणे विभागातील शाहपूर गावात घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : देवाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरबाजीची सांगितली 'ती' आतली गोष्ट, नेमकं काय म्हणाले?

अंघोळ करताना बाथरुममध्ये हिडन कॅमेरा 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी तक्रारीत म्हटलं की, तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. तसेच शाहपूर गावात भाडेतत्वावर खोली घेऊन राहते. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार होती, पण तिच्यासोबत नको तेच घडलं. सोमवारी तरुणी ही अंघोळ करत होती. तेव्हा तिला बाथरूममध्ये एक हिडन कॅमेरा दिसून आला होता. हे सर्व पाहून तरुणीला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. तिने तो कॅमेरा काढला आणि खोलीत ठेवला. त्याच दिवशी सायंकाळी ती कामावरून घरी परतल्यावर तिने कॅमेरा तपासला असता, तिला शेजारच्या भाडेकरु असलेल्या रामानंदचे अनेक फोटो आणि व्हिडिओ कार्ड चिपवर आढळून आले होते.

आरोपी रामानंद हा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरातील रहिवासी असून इलेक्ट्रेशनचं काम करतो. पीडितेला तिच्या बाथरूच्या बाहेर लपवण्यात आलेला कॅमेरा एसडी कार्ड बसवतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सापडले.

हे ही वाचा : पती-पत्नी करत होते हॉलमध्ये आराम, 40 वर्षे जून्या इमारतीचा कोसळला स्लॅब, वसईत नेमकं काय घडलं?

कृत्याबाबत कबुलीनामा

दरम्यान, आरोपी रामानंद हा महिलेच्या इमारतीतील रहिवासी आहे. महिलेनं आरोप केला की, रामानंदने तिचे काही व्हिडिओ काढण्यासाठी तिच्या बाथरूममध्ये एक हिडन कॅमेरा लावला होता. महिलेनं संबंधित प्रकरणावरून त्याला विचारणा केली असता, त्याने या कृत्याबाबत कबुलीनामा दिला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp