खोलीत बंद केलं अन् वारंवार भिंतीवर डोकं आपटत... 2 वर्षांच्या मुलासोबत वडिलांचं निर्घृण कृत्य! नंतर स्वत:वर सुद्धा...

मुंबई तक

एका 2 वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्याच वडिलांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर, मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडिलांनी स्वत:वर कुऱ्हाडीने वार केले.

ADVERTISEMENT

2 वर्षांच्या मुलासोबत वडिलांचं निर्घृण कृत्य!
2 वर्षांच्या मुलासोबत वडिलांचं निर्घृण कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खोलीत बंद केलं अन् वारंवार भिंतीवर डोकं आपटत...

point

2 वर्षांच्या मुलासोबत वडिलांनी केलं भयानक कृत्य!

Crime News: राजस्थानच्या थैरथल-तिजारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका वडिलांनी क्रूरतेच्या मर्यादाच ओलांडल्याचं सांगितलं जात आहे. एका 2 वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्याच वडिलांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर, मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडिलांनी स्वत:वर कुऱ्हाडीने वार केले आणि यात आरोपी गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही भयानक घटना थैरथल-तिजारा जिल्ह्यातील तिजारा कस्बे येथील असल्याची माहिती आहे. 

प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव शाजिद असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. एफएसएल टीमने देखील घटनास्थळी तपास केला. आरोपीचा स्वभाव रागीट असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. 

हे ही वाचा: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे दागिने लुटायचे, चोरीची 'अशी' ट्रिक अन्... ठाण्यातील दोघांना अटक

वारंवार भिंतीवर डोकं आपटलं अन्...

प्राथमिक तपासादरम्यान, शाजिदने आपल्या मुलाला एका खोलीत बंद केलं आणि खूप वेळा त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. यामध्ये, 2 वर्षांच्या पीडित मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर, शाजिदने लगेच स्वत:वर कुऱ्हाडीने वार केले आणि यात तो गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आरोपीची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्याला जयपुर रुग्णालयात रेफर करण्यात आलं. 

हे ही वाचा: Govt Job: पदवीधरांसाठी खुशखबर! 'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती... कधीपर्यंत कराल अप्लाय?

पोलिसांचा तपास 

आरोपी तरुणाची तब्येत बरी झाल्यानंतरच  त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृताच्या वडिलांची चौकशी केल्यानंतरच हत्येमागचं खरं कारण समोर येईल. शाजिदने यापूर्वी सुद्धा आपल्या रागीट स्वभावामुळे वादात एका व्यक्तीला जखमी केल्याचं तपासात समोर आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp