राज्यात 'या' तारखेपर्यंत उकाडाच, मान्सूनची संथ गती; काय सांगतं हवामान?
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागानुसार, जून महिन्यात मान्सूनचा अंदाज आहे. काही भागांत सद्यास्थितीत पावसाची शक्यता नाही, तसेच तापमान उच्च राहील अशी शक्यता वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागानुसार, जून महिन्यात मान्सूनचा अंदाज आहे. काही भागांत सद्यास्थितीत पावसाची शक्यता नाही, तसेच तापमान उच्च राहील अशी शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि खानदेशात 40 अंशापर्यंत तापमानात वाढ होणार आहे. अनेक भागांत पावसाचा प्रभाव कमी असल्याने याचा शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
मान्सून सुरू होण्यानंतरही अनेक भागांत पावसाचा अभाव जाणवतो. हवामान विभागाने काही भागांसाठी पावसाचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांत पावसाची शक्यचा कमी असल्याचा अंदाज आहे. याचमुळे काहीअंशी प्रमाणात कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला हवामान विभाग देते.
तसेच विजांच्या कडकडटामुळे नुकसान होण्याची अधिक शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून या अनुषंगाने नागरिकांनी सुरक्षिततेची स्वत:हून दक्षता घ्यावी.









