उच्चभ्रू सोसायटीत एकट्या राहणाऱ्या महिला प्रोफेसरला कुणी संपवलं?
एका फ्लॅटमध्ये सुप्रसिद्ध कॉलेजच्या महिला प्रोफेसरचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्या फ्लॅटमध्ये एकट्याच रहात होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उच्चभ्रू सोसायटीत एकट्या राहणाऱ्या महिला प्रोफेसरला कुणी संपवलं?
हत्येनंतर दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Crime News : एका फ्लॅटमध्ये सुप्रसिद्ध कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर देवोस्मिता पॉल (वय 42) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. देवोस्मिता या मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी असून त्या या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या, तर त्यांचे पती बेंगलोर येथे राहतात. दोन दिवसांपासून त्या कॉलेजमध्ये गेल्या नव्हत्या आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. अखेर त्यांच्या ड्रायव्हरने ही माहिती देवोस्मिता यांच्या बहिणीला दिली.
त्यानंतर 4 जून रोजी दुपारी बहिणीने सोसायटीच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडला असता, ड्रॉइंग रूममध्ये देवोस्मिता यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. फ्लॅटच्या बाहेर आदल्या दिवसाचे वृत्तपत्र पडून असल्याने ही हत्या एक-दोन दिवसांपूर्वीच झाल्याचा अंदाज आहे. दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव येथील सत्यम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.
सगळं काही सुरक्षित
या प्रकरणातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही. घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित असून देवोस्मिता यांचा मोबाईल फोनही घरातूनच जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक तपासानुसार, मारेकऱ्याने घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही चिन्ह नाही. देवोस्मिता यांनी स्वतः ओळखीच्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडला असावा, म्हणजेच हा 'फ्रेंडली एंट्री'चा प्रकार असावा असा पोलिसांचा दाट संशय आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर अत्यंत हुशारीने फ्लॅटला बाहेरून कुलूप लावले आणि तो सोसायटीतून फरार झाला.
हे ही वाचा : अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीच, पुढचा नेमका प्लॅन काय?
सीसीटीव्ही नसल्याने अडचण
तपास पथकासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे फ्लॅटच्या आसपास कोणतीही सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नाही. मृत देवोस्मिता या अत्यंत मर्यादित लोकांच्या संपर्कात असायच्या आणि शेजाऱ्यांशीही फारशा बोलत नसत. मात्र, त्या बहुतांश वेळा ऑनलाईन जेवण आणि इतर वस्तू मागवायच्या. त्यामुळे पोलीस सध्या सोसायटीच्या मुख्य गेटवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, डिलिव्हरी बॉईज आणि अलीकडच्या काळात त्यांच्या घरी आलेल्या संशयितांची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या कौटुंबिक वादाच्या बाजूनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.









