मित्रासोबत समलैंगिक संबंध आणि 'ती' धमकी, शेवटी घडलं हत्याकांड

मुंबई तक

समलैंगिक संबंधातून एका मित्राने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मित्रासोबत समलैंगिक संबंध आणि धमकी

point

शेवटी घडलं हत्याकांड

Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील सैफनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला आहे. 26 मे रोजी सैफनी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती, ज्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाच्या तपासाला गती दिली. या प्रकरणाचा यशस्वी खुलासा करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे.

वेल्डिंगचे काम करायचे

स्थानिक पोलीस, एसओजी (SOG) आणि सर्व्हिलन्सच्या संयुक्त पथकाने या कारवाईत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेले आरोपी मृत तरुणाचे ओळखीचे असून ते राजस्थानमध्ये एकत्र काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहसीन, दानिश आणि कासिम अशी आहेत. हे तिघेही एकमेकांचे मित्र असून राजस्थानमध्ये वेल्डिंगचे काम करत असत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून मृत तरुणाचा तोडलेला मोबाईल फोन, गळ्यातील चेन, अंगठी आणि काही रोकड हस्तगत केली आहे.

हे ही वाचा : Pune Metro : टिंडरवर भेटली, व्हाट्सअ‍ॅपवर चॅटिंग अन् तब्बल 7 कोटींचा चुना!

समलैंगिक संबंध

या हत्येमागील धक्कादायक कारणाचा खुलासा करताना रामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग सिंग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात समलैंगिक संबंधांतून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुण आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे समलैंगिक संबंध होते. मृत तरुणाने या संबंधांचा एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ तो वारंवार त्याच्या भागीदाराच्या (पार्टनरच्या) कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत होता. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने आरोपींनी एकत्र येऊन या तरुणाची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याची गळा चिरून हत्या केली.

हे ही वाचा : मित्रासोबत मिळून आधी प्रेयसीवर बलात्कार, नंतर पेट्रोल टाकून जाळलं; कारण काय?

आरोपी अटकेत

26 मे रोजी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची तीन पथके या प्रकरणाचा तपास करत होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर या तिन्ही आरोपींना अटक केली. या खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले असून, आरोपींविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
 

हे वाचलं का?