Pune Metro : टिंडरवर भेटली, व्हाट्सअॅपवर चॅटिंग अन् तब्बल 7 कोटींचा चुना!
Pune Metro : टिंडर ॲपवर झालेली ओळख, करन्सी ट्रेडिंगमधील मोठ्या परताव्याचे आमिष आणि टेलिग्रामवरील मार्गदर्शन यामुळे पुण्यातील एका व्यक्तीची तब्बल 7 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Pune Metro : टिंडरवर भेटली
व्हाट्सअॅपवर चॅटिंग अन् तब्बल 7 कोटींचा चुना!
Pune Metro : पुण्यातील एका व्यक्तीची ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 7 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचं समोर आलंय. सायबर गुन्हेगारांनी रचलेला हा 'हनी ट्रॅप' आणि फसवणुकीचा सापळा कसा होता? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात..
हेही वाचा : सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...
पुण्याच्या प्रसिद्ध व्यावसायिकाने ट्रेडिंगमध्ये 7 कोटी कसे गमावले?
संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये मोबाईलवर टिंडर डेटिंग ॲपची जाहिरात पाहिल्यानंतर त्याने ते ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्याची श्रेया मिश्रा नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये टेलिग्राम आणि मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. नियमित संवाद सुरू असतानाच श्रेयाने त्याला करन्सी ट्रेडिंगबाबत माहिती दिली. या क्षेत्रात तिला मोठा फायदा झाल्याचा दावा करत तिने संबंधित व्यक्तीला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर तिने पीयू प्राईम नावाच्या प्लॅटफॉर्मची माहिती दिली आणि त्यावर खाते उघडण्यास सांगितले.
हेही वाचा : ‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?









