मित्रासोबत मिळून आधी प्रेयसीवर बलात्कार, नंतर पेट्रोल टाकून जाळलं; कारण काय?
एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने ज्या तरुणावर प्रेम केलं होतं आणि ज्याच्यावर विश्वास ठेवून घर सोडलं होतं, तोच तिचा सर्वात मोठा शत्रू बनला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
15 वर्षीय प्रेयसीचा 50 हजारांना सौदा ठरला
पण तिने विरोध करताच सगळंच संपलं
काय घडलं?
Crime News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक झाल्याची एक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने ज्या तरुणावर विश्वास ठेवून घर सोडले होते, तोच तिचा सर्वात मोठा शत्रू बनला. आरोपी प्रियकराने केवळ आपल्या अल्पवयीन प्रेयसीचा सौदाच केला नाही, तर तिने विरोध केल्यावर मित्रांच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिला. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
प्रेमसंबंध आणि पलायन
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील भिंड येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचे शेजारच्या गावातील रामू गुर्जर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 28 मे रोजी रामूने तिला फूस लावून पळवून नेले आणि ग्वाल्हेरला आणले. या संपूर्ण कटात रामूचा मित्र अरुण देखील सामील होता. हे दोन्ही आरोपी मुलीला ग्वाल्हेरच्या जनकगंज भागातील एका निर्जन टेकडीवर घेऊन गेले. त्या ठिकाणी रामू आणि अरुण या दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
हे ही वाचा : रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?
गर्लफ्रेंडचा सौदा
क्रूरतेची सीमा ओलांडत रामूने आपल्याच प्रेयसीला अरुणकडे 50,000 रुपयांना विकण्याचा सौदा केला. जेव्हा पीडित मुलीला या घृणास्पद सौद्याची माहिती मिळाली आणि तिने याला कडाडून विरोध केला, तेव्हा रामू आणि अरुणने तिचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 29 मे रोजी रामू त्याचा मित्र अरुण आणि आणखी एक साथीदार गौरव कुशवाहा यांच्यासह पुन्हा त्या टेकडीवर पोहोचला. पुरावा मिटवण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही आणि आरोपी अर्धवट जळालेला मृतदेह तसाच सोडून तिथून पसार झाले.
हे ही वाचा : कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं, अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 7 महिने चौघांनी लचके तोडले
'असं' बाहेर आलं प्रकरण
दुसरीकडे, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती आणि रामूवर संशय व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रामूला ताब्यात घेतले आणि त्याची कडक चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी रामू गुर्जर, अरुण आणि गौरव कुशवाहा यांना अटक केली असून टेकडीवरून पीडितेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









