Maharashtra Weather : राज्यात तुफानी पावसाची शक्यता, 26 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यातील काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या काहीच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार आहे. मात्र, यापूर्वीच राज्यातील काही भागांत वादळ वारे सुटल्याचं दिसून येते. पुढील काही तास अगदी महत्त्वाचे असून सोमवारी राज्यातील कोकणपासून ते विदर्भापर्यंत 26 जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
येत्या काहीच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार
8 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
Maharashtra Weather : राज्यातील काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या काहीच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार आहे. मात्र, यापूर्वीच राज्यातील काही भागांत वादळ वारे सुटल्याचं दिसून येते. पुढील काही तास अगदी महत्त्वाचे असून सोमवारी राज्यातील कोकणपासून ते विदर्भापर्यंत 26 जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच 8 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.
हे ही वाचा : नागपूर: पिकनिकला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू, बापासह लेकाचा समावेश
कोकण
कोकणातील पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार असून दुपारनंतर हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई या दोन ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला. तसेच रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वारे, मध्यम पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक कायम राहील. येत्या 48 तासांच पाचही जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच विभागात वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हवामान कोरडं राहिल, ज्यात नांदूरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगरातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
