शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सासरा म्हणाला, रात्री पळून गेली होती! नवराही शिक्षकी पेशात

Crime News : शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सासरा म्हणाला, रात्री पळून गेली होती!

Mumbai Tak

मुंबई तक

27 Sep 2025 (अपडेटेड: 27 Sep 2025, 06:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

point

शेतात सापडला शिक्षिकेचा मृतदेह

Crime News : शेतात शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुष्पा कुमारी अशी मृत शिक्षिकेचं नाव आहे. ष्पाचा मृतदेह डुमरी रोडवरील सासरच्या घरामागील शेतात आढळला. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून शनिवारी ही घटना समोर आली आहे. सुपौल बाजार परिसरातून हा प्रकार समोर आलाय. मृत महिलेची ओळख पटली असून पुष्पा कुमारी असं तिचं नाव आहे. दरम्यान, शिक्षिकेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा :  महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त, मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले; कोणी केली मदत?

मुलगी रात्री पळून गेली होती, मृत शिक्षिकेच्या सासऱ्याचा दावा 

अधिकची माहिती अशी की, मृत शिक्षिका  पुष्पा कुमारी सासरी डुमरी येथे राहून गौडाबौराम प्रखंडातील गनौनी परसाराम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. पुष्पाच्या सासऱ्याने सांगितले की ती रात्री घरातून पळून गेली होती. शिक्षिकेचा पती प्रमोद प्रसाद हाही जोगियारा येथील सरकारी शाळेत शिक्षक आहे. तर, पुष्पाचे माहेर कुशेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिंडुआ गावात आहे. शिक्षिकेचे वडील प्रमोद कुमार साहू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन दरभंगा येथील डीएमसीएच रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हेही वाचा : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या; अहमदनगरमध्ये काय घडलं?

मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टेम नंतरच स्पष्ट होणार 

मृत शिक्षिकेचे वडील पुढे बोलताना म्हणाले,  मुलीच्या सासऱ्यांनी मुलगी पळून गेल्याची माहिती अलीपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कुंवर साहू यांना कळवली होती. त्यांनी मला ही माहिती फोनवरुन दिली होती. मुलगी पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी 7 वाजता ते सुपौल बाजारातील त्यांच्या सासऱ्यांच्या घराजवळ डुमरी येथे पोहोचले. मात्र, त्यांना शेतात मुलीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात आहे. शिक्षिकेची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली जात असून, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

 

 

    follow whatsapp